अल्पसंख्यांवरील अन्यायासाठी जातीयवादी पक्षांसह धर्मनिरपेक्ष पक्ष ही जबाबदार - इकबाल अन्सारी

सातारा : भारताच्या स्वातंत्र्या पासून महासत्ता बनविण्याच्या विचारांपर्यंत सर्वच पातळीवर मुस्लिम समाज आपले बहुमोल योगदान देत आला आहे . स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना मुस्लिम समाजाचा विकास करण्याचे तर दूरच, पण मुस्लिमांवर अन्याय वाढला आहे आणि अन्याय करणारे सत्ताधारी जातीयवादी पक्षाशी संबंध दाखवत असताना धर्म निरपेक्ष विरोधक कोणताही विरोध न करता मुस्लिमांवरील अन्यायाचा तमाशा बघत बसून एकप्रकारे साथ देत आहेत असे उद्गार ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. इकबाल अन्सारी यांनी सांगली जिल्हा कार्यकारिणीच्या बैठकीत काढले.
सांगली जिल्ह्याचे अध्यक्ष कै. बादशहा पाथरवट यांच्या मृत्यूनंतर जिल्हाध्यक्ष पद रिक्त असून पदासाठी अनेकांनी कंबर कसली आहे. त्यामुळे इच्छुकांच्या मुलाखती सांगली येथील हॉटेल अंबॅसिडर येथे आयोजित करण्यात आल्या होत्या. त्यावेळेस मार्गदर्शन करताना पदाधिकारी यांना मरगळ झटकून समाजाच्या विकासाचे व्रत घेऊन कार्यरत होण्याचा सल्ला इकबाल अन्सारी यांनी दिला.
      धर्मनिरपेक्ष पक्ष मुस्लिमांना आपली बटीक समजून गृहीत धरित आहे व विकासासाठी बोलायचे तर सोडा उलट मुस्लिमांवरील होत असलेल्या अन्यायाला मूक संमती देत असून मूग गिळून गप्प बसत आहेत. त्यामुळे संघटनेची पुनर्बांधणी करून पुन्हा संघटनेचा नावलौकिक तयार करावा व एवढी ताकत निर्माण करूया की, जातीयवादी पक्षांसह , धर्मनिरपेक्षतेच्या आडून मुस्लिमांवर अन्याय करणाऱ्या पक्षांना धडा शिकवू असे आवाहन महाराष्ट्र राज्य अध्यक्ष मा.सादिकभाई शेख यांनी केले आहे.
    समाजात व संघटनेत एकजूट असली तर समाज व संघटना सक्षम बनते व हेच बलशाली भारत घडविण्यासाठी महत्वाचे पाऊल असेल असे मत अमीन शेख यांनी व्यक्त केले. सूत्र संचालन कोल्हापूर जिल्हाध्यक्ष जहांगीर हजरत यांनी केले तसेच एम.एस.गवंडी, नाशिर शरीक मसलत, अय्युब बारागिर,शाहीन मुल्ला यांनी मार्गदर्शन केले. कबीर मुजावर, शहानवाज मुल्ला व सर्व पदाधिकारी यांनी नेटके आयोजन केले व श्री सोनवणे यांनी आभार मानले .

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला