किसनराव साबळे पाटील सोसायटीचा १३ टक्के लाभांश वाटप

शिवथर.:  किसनराव साबळे पाटील सोसायटीचा विस्तार वाढलेला असून यावर्षीचा नफा सोळा लाख रुपये झालेला आहे त्यामुळे सोसायटीच्या सर्व सभासदांना 13 टक्के लाभांश वाटप करण्यात आलेला आहे दरवर्षीच सोसायटी सभासदांना लाभांश वाटप करत असते तसेच शेळीपालन गाय आणि म्हैस कर्ज प्रकरण सर्वसामान्य शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा करत असते. त्याचप्रमाणे पीक कर्ज अल्पमुदत कर्ज मध्यम मुदत कर्ज ट्रॅक्टर कर्ज दोन चाकी कर्ज घरकुल साठी देखील सोसायटीच्या माध्यमातून कर्ज पुरवठा अल्प व्याजदरात केला जातो असे प्रतिपादन सोसायटीचे चेअरमन जितेंद्र पिसाळ यांनी केले 

 त्यावेळी सोसायटीचे माजी चेअरमन तसेच तज्ञ संचालक प्रदीप साबळे पाटील जिल्हा नियोजन समितीचे सदस्य किरण साबळे पाटील व्हा चेअरमन संतोष साबळे सचिव अजित साबळे माजी गटसचिव कालीदास साबळे माजी उपसरपंच नवनाथ साबळे माजी चेअरमन विलास साबळे संजय साबळे विलास साबळे पाटील पतसंस्थेचे व्हाईस चेअरमन अशोक साबळे आदी मान्यवर उपस्थित होते 

 माजी उपसरपंच नवनाथ साबळे म्हणाले किसनराव साबळे पाटील सोसायटीचा अमृत महोत्सव साजरा करण्यासाठी सोसायटीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी एकमताने प्रयत्न केले पाहिजेत सोसायटीचे संचालक अनिल साबळे रमेश साबळे उपसरपंच दत्तात्रय साबळे माजी उपसरपंच सुनील बळीराम साबळे हनमंत साबळे संजय साबळे माजी उपसरपंच बाबुराव साबळे शरफुद्दीन इनामदार शिवाजी साबळे सतीश साबळे बबन साबळे सुभाष साबळे व सर्व सभासद उपस्थित होते

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त