सातारा जि प वरिष्ठ सहाय्यकांच्या चौकशीची रिपाइंची निवेदनाद्वारे मागणी

Satara District Senior Asst.'s Inquiry Demanded by Repaini's Statement

सातारा  : सातारा जिल्हा परिषद सातारा लघु पाटबंधारे विभागातील वरिष्ठ साहाय्यक लेखाधिकारी श्री पंढरीनाथ दरेकर यांची चौकशी करून दोषी आढळल्यास तात्काळ निलंबित करावे. त्यांच्या संपत्तीची ही चौकशी करावी अशी मागणी रिपाइं ने केली आहे तसेच त्यांची  नार्को टेस्ट करावी असे ही सूचित केले आहे याबाबत निवेदनात नमूद केले आहे की, सातारा जिल्हा परिषद सातारा लघुपाटबंधारे विभाग येथील वरिष्ठ साहाय्यक लेखाधिकारी श्री पंढरीनाथ दरेकर यांनी सन २०१९ मध्ये मुळीकवाडी साठवण बंधारा बांधणे ता. खटाव जि. सातारा हे काम ज्या ठेकेदाराने पुर्ण केले त्या ठेकेदाराच्या नावावर दरेकर अधिका-याने आपल्या पदाचा गैरवापर करून शासनाची फसवणुक केली आहे. असा आरोप करण्यात आला आहे. या निवेदनाची त्वरित दखल न घेतल्यास आंदोलन करण्याचा तोंडी इशारा देण्यात आला आहे.संबंधित ठेकेदाराच्या नावावर रू. १,४०,४००/- ही अतिरिक्त सुरक्षा ठेव डी डी रक्कम शासनाच्या नियमाप्रमाणे एकदाच काढणे हे नियमात आहे.तसा शासन अध्यादेश आहे.तरीही अनामत रक्कम दोन वेळा काढली आहे.वरील रक्कम त्यांनी दोन वेळा कोणत्या अधिकाराने कायद्याने काढली ही माहिती आम्ही माहिती अधिकारात मागविली असता त्यांनी आम्हाला दिली नाही. संबंधित अधिका-याने शासनाची  फसवणुक केली आहे. अशी तक्रार निवेदनात केली आहे.या निवेदनावर रिपाई युवक आघाडी जिल्हा उपाध्यक्ष प्रतिक गायकवाड,आप्पासाहेब तुपे ,सचिन वायदंडे, वैभव गायकवाड ,अक्षय कांबळे ,रविंद्र बाबर राज काकडे ,राजु कांबळे ,जावेद सय्यद, नाना कांबळे यांच्या सह्या आहेत.दरम्यान, संबधित अधिकाऱ्यांशी संपर्क होऊ शकला नसल्याने त्यांची बाजू समजू शकली नाही.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त