एखाद्या औषधापेक्षा कमी नाही 'लवंग पाणी', जाणून घ्या पिण्याचे फायदे

सातारा न्यूज  : आपल्या किचनमध्ये असलेले काही पदार्थ आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर  ठरतात. असाच एक मसाला आहे लवंग. लवंग अनेक औषधी गुणधर्मांनी समृद्ध आहे. त्यामुळे आरोग्याशी संबंधीत अनेक समस्यांवर ती फायदेशीर  ठरते. लवंगाचे पाणी आरोग्यासाठी खूप उपयुक्त आहे. लवंगाच्या पाण्यात व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन के, कॅल्शियम, मॅग्नेशियम, मॅंगनीज सारखे पोषक घटक आढळतात, जे आरोग्यासाठी खूप उपयुक्त असतात. आज या लेखातून आपण लवंगाच्या पाण्याचे फायदे जाणून घेणार आहोत.
 
लवंग पाण्याचे फायदे  
 
पचनक्रिया सुधारते : लवंगाच्या पाणी प्यायल्याने पचनक्रिया सुधारण्यास मदत होते. लवंगाचे पाणी पोटदुखीसाठीच नाही तर गॅस, अपचन इत्यादी समस्यांपासून देखील आराम मिळवून देते.

रोगप्रतिकारशक्ती वाढते: लवंगाचे पाणी तुमची रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यातही खूप मदत करू शकते. तुम्हाला फ्लूची लागण झाली असेल तर लवंगाचे पाणी फ्लूच्या विषाणूशी लढण्यासाठी उपयुक्त ठरू शकते.
 
दात आणि तोंडाच्या आरोग्य: लवंगाचे पाणी दात आणि तोंडाच्या आरोग्यासाठी देखील खूप फायदेशीर आहे. लवंगाच्या पाण्यात अनेक अँटीबॅक्टीरियल गुणधर्म असतात जे बॅक्टेरियाशी लढण्यास मदत करतात. यामुळे तोंड निरोगी ठेवण्यास मदत होते.
 
सूज दूर होते : लवंगाच्या पाण्याच्या सेवनाने शरीरातील कोणत्याही प्रकारची सूज दूर होऊ शकते. या पाण्यामध्ये दाहक-विरोधी गुणधर्म असतात. तसेच यात असलेल्या अँटीऑक्सिडंट्समुळे संधिवातात होणाऱ्या त्रासापासून देखील आराम मिळतो.

शुक्राणूंची संख्या सुधारते: सकाळी लवंगाचे पाणी प्यायल्याने स्पर्म काउंट वाढतो. एवढेच नाही तर लवंगाचे पाणी ऑलिगोस्पर्मिया (Oligospermia) म्हणजेच शुक्राणूंची कमतरता दूर करते.
 
कधी प्यावे लवंगाचे पाणी?
 
तुम्ही सकाळी उठल्यानंतर रिकाम्या पोटी लवंगाचे पाणी पिऊ शकता. यासाठी लवंग रात्रभर पाण्यात भिजवून ठेवा आणि दुसऱ्या दिवशी सेवन करा. याशिवाय तुम्ही सकाळी उठून लवंग पाण्यात उकळून पिऊ शकता. तुम्ही रात्री झोपतानाही लवंगाचे पाणी पिऊ शकता.
 
लवंग पाणी बनवण्याची योग्य पद्धत
 
लवंगाचे पाणी बनवण्यासाठी प्रथम एका ग्लास गरम पाण्यात मूठभर लवंग रात्रभर भिजवा. दुसऱ्या दिवशी सकाळी त्याच पाण्यात भिजवलेल्या लवंगा उकळा. गरजेनुसार पाण्याचे प्रमाणही वाढवता येते. हे पाणी 15-20 मिनिटे उकळल्यानंतर गॅस बंद करा. पाणी थंड करून त्यातून लवंगा चाळणीच्या साहाय्याने वेगळ्या करा आणि पाणी पिऊन घ्या.
 
(टीप - या लेखात दिलेली माहिती ही उपलब्ध सामग्री आणि स्त्रोतांनुसार दिलेली आहे. तुमचे शरीर आणि आरोग्याच्या स्थितीनुसार कोणताही उपाय करून पाहाण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे सातारा न्यूज .)

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला