चिंतामणी पार्श्वनाथ ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेत २४ कोटी १ लाख ६० हजार ७६१ रुपयांचा अपहार प्रकरणी चेअरमनसह संचालक आणि व्यवस्थापकाला चार वर्षांनंतर अटक

कोळकी, ता. फलटण येथील चिंतामणी पार्श्वनाथ ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेत २४ कोटी १ लाख ६० हजार ७६१ रुपयांचा अपहार झाला होता

कोळकी, ता. फलटण येथील चिंतामणी पार्श्वनाथ ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेत २४ कोटी १ लाख ६० हजार ७६१ रुपयांचा अपहार झाला होता. याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने या संस्थेच्या चेअरमनसह संचालक आणि व्यवस्थापकाला चार वर्षांनंतर अटक केली आहे.

कोळकी येथील चिंतामणी पार्श्वनाथ ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेतील चेअरमन, संचालक, व्यवस्थापक यांनी पतसंस्थेच्या ठेवीदारांकडून ठेवीच्या रकमांचा अपहार करून ठेवीदारांची आर्थिक फसवणूक केली होती. याप्रकरणी ३१ जानेवारी २०१९ रोजी फलटण शहर पोलिस ठाण्यात दोन गुन्हे दाखल करण्यात आले होते. या प्रकरणाचा तपास साताऱ्यातील आर्थिक गुन्हे शाखा करत आहे. गेल्या चार वर्षांपासून संशयित पोलिसांना गुंगारा देत होते. दरम्यान, दि. २८ रोजी संशयित हे साताऱ्यात येणार असल्याची माहिती आर्थिक गुन्हे शाखेला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून नितीन शांतीलाल कोठारी (वय ६६, रा. फलटण), माधव कृष्णा अदलिंगे (५६, रा. जाधववाडी, फलटण), जावेद पापाभाई मणेर (५२, रा. फलटण) यांना अटक केली. ही कारवाई पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक अजित बोऱ्हाडे, आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस उपअधीक्षक मोहन शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि शिवाजी भोसले, सहाय्यक फौजदार प्रमोद नलवडे, मनोज जाधव, संतोष राऊत, शफिक शेख, प्रसाद जाधव यांनी केली.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला