मोदींच्या मातोश्रींना अखेरचा निरोप; गांधीनगरमध्ये अंत्यसंस्कार
Satara News Team
- Fri 30th Dec 2022 09:59 am
- बातमी शेयर करा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्री हिराबेन मोदी यांचं वयाच्या १०० व्या वर्षी निधन झालं. दोन दिवसांपासून त्यांना श्वसनाचा त्रास होत असल्याने त्यांना अहमदाबाद इथल्या रुग्णालयात दाखल कऱण्यात आलं होतं. आज पहाटे ३.३० वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आईच्या अंत्यदर्शनासाठी गुजरातेत दाखल होत आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हिराबेन मोदी यांचं आज निधन झालं. त्या १०० वर्षांच्या होत्या. गेल्या दोन तीन दिवसांपासून त्यांना श्वसनाचात्रास होत होता. त्यामुळे त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होतेमोदी यांनी स्वतः ट्वीट करत ही माहिती दिली आहे. आपल्या ट्वीटमध्ये पंतप्रधान मोदी म्हणतात, "शानदार शताब्दी का ईश्वर चरणों में विराम...मां में मैंने हमेशा उस त्रिमूर्ति की अनुभूति की है, जिसमें एक तपस्वी की यात्रा, निष्काम कर्मयोगी का प्रतीक और मूल्यों के प्रति प्रतिबद्ध जीवन समाहित रहा है|मैं जब उनसे 100वें जन्मदिन पर मिला तो उन्होंने एक बात कही थी, जो हमेशा याद रहती है कि કામ કરો બુદ્ધિથી, જીવન જીવો શુદ્ધિથી यानि काम करो बुद्धि से और जीवन जियो शुद्धि से।"
दुःखातून बाहेर पडण्याचं बळ मिळो; राज ठाकरेंनी वाहिली श्रद्धांजली
पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी ह्यांना मातृवियोग झाला. आईचं मायेचं छत्र गमावणं ह्या इतकं मोठं दुःख असूच शकत नाही. ह्या दुःखातून बाहेर पडण्याचं बळ मोदीजींना ईश्वराने देवो हीच प्रार्थना. मोदीजींच्या आईंना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची विनम्र श्रद्धांजली.
आईचे छत्र हरपणे या सारखे अनाथपण नाही; संजय राऊतांनी व्यक्त केला शोक
आईचे छत्र हरपणे या सारखे अनाथपण नाही.आई जाण्याचे दुःख मोठे आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या आई हिराबेन यांच्या दुःखद निधनाने त्यांच्या कुटुंबीयावर आघात झाला आहे.ईश्वर मातोश्री हीराबेन यांच्या आत्म्यास शांती देवो. मोदी कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत.
कठीण समयी मोदींना बळ मिळो; राहुल गांधींची प्रार्थना
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदी यांच्या मातोश्री हिराबेन यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. आपल्या ट्वीटमध्ये राहुल गांधी म्हणतात, " पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्री श्रीमती हिरा बा यांच्या निधनाचं वृत्त अत्यंत दुःखद आहे. या कठीण समयी मी त्यांच्या आणि त्यांच्या परिवाराबद्दल संवेदना आणि त्यांना प्रेम व्यक्त करतो."
स्थानिक बातम्या
सातारा न्यूज राशिभविष्य आज ७/७/२०२५ सोमवार
- Fri 30th Dec 2022 09:59 am
सातारा न्यूज राशिभविष्य शनिवार दि. ०५ जुलै २०२५
- Fri 30th Dec 2022 09:59 am
सातारा न्यूज राशिभविष्य आज ४/७/२०२५ शुक्रवार
- Fri 30th Dec 2022 09:59 am
सातारा न्यूज राशिभविष्य ३/६/२०२५ गुरुवार
- Fri 30th Dec 2022 09:59 am
सातारा न्यूज राशिभविष्य बुधवार दि.०२ जुलै २०२५
- Fri 30th Dec 2022 09:59 am
शिक्षण प्रसारक संस्थेचे आधारवड संस्था सचिव तुषार पाटील यांचा वाढदिवस उत्साहात साजरा
- Fri 30th Dec 2022 09:59 am
संबंधित बातम्या
-
औंध पोलिस ठाण्याचे कारभारी मतेंवर गोरे अंकुश ठेवणार? कि पोलिस अधीक्षक दोषी ठरवणार?
- Fri 30th Dec 2022 09:59 am
-
जिल्हा परिषद नगररचना विभागात रंगली सामूहिक बिर्याणीची पार्टी.
- Fri 30th Dec 2022 09:59 am
-
अजंठा चौकात टपरी चालकाचे नगरपालिकेला आव्हान
- Fri 30th Dec 2022 09:59 am
-
सातारा जिल्हा पोलीस क्रीडा प्रबोधिनीमधील ०३ खेळाडुंची राष्ट्रीय स्पर्धेकरीता महाराष्ट्र संघातुन निवड
- Fri 30th Dec 2022 09:59 am
-
औंध ग्रामीण रूग्णालयातील ऑक्सिजन वर असलेल्या व्यवस्थेने घेतला नवजातचा बळी?
- Fri 30th Dec 2022 09:59 am
-
सर्वसामान्य जनतेच्या मते औंध पोलिस ठाण्याचे विद्यमान कारभारी अवैध व्यवसायांच्या बाबतीत गांधारीच्या भुमिकेत
- Fri 30th Dec 2022 09:59 am
-
पुसेसावळी येथे पतसंस्थेच्या नावाखाली खाजगी सावकारीचा धंदा सुरू
- Fri 30th Dec 2022 09:59 am
-
"असे" पालकमंत्री मिळणे सातारा जिल्ह्यासाठी दुर्दैवी..
- Fri 30th Dec 2022 09:59 am