प्रतापगडच्या संवर्धनासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून 25 कोटी ची घोषणा
प्रकाश शिंदे- Wed 30th Nov 2022 06:02 pm
- बातमी शेयर करा
प्रतापगड : प्रतापगड संवर्धनासाठी 100 कोटी रूपयांची गरज असल्याचा आराखडा जिल्हा प्रशासनाने तयार केला आहे. राज्यातील सर्वच गडाचे संवर्धन करण्याची जबाबदारी ही आपणा सर्वांची तसेच सरकारची आहे. त्यामुळे पहिल्यांदा आम्ही सुरूवात म्हणून 25 कोटी रूपयांची निधी प्रतापगडाला देणार असल्याचे जाहीर केले. तसेच पुढील काळात जेवढा निधी लागेल तेव्हा उपलब्ध करून दिला जाईल असे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले.
किल्ले प्रतापगड (ता. महाबळेश्वर, जि. सातारा) येथे 363 वा शिवप्रताप दिनास उत्साहात सुरुवात झाली आहे. यावेळी उत्पादन शुल्क मंत्री तथा पालकमंत्री शंभूराज देसाई, पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा, खा. श्रीनिवास पाटील, खा. रणजितसिंह नाईक- निंबाळकर, आ. मकरंद पाटील, आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले, आ. महेश शिंदे, आ. महादेव जानकर, आ. भरत गोगावले उपस्थित आहेत. मुख्यमंत्री यांचे तुतारी वाजवून ढोल- ताशाच्या गजरात जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी गडावर भवानी मातेची विधिवत पूजा व आरती मुख्यमंत्र्यासह मान्यवरांच्या हस्ते करण्यात आली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, प्रतापगडावर येणाऱ्या प्रत्येक शिवभक्तांच्या चेहऱ्यावर एक वेगळा आनंद दिसत होता. आजही या ठिकाणची माती पराक्रमांची साक्ष देत आहे. छ. शिवाजी महाराजांनी इतिहास घडविला. रयतेच्या गवताच्या काडीच्या
देठाला हात लागता कामा नये, अशी महाराजांची भूमिका होती. रयतेच्या रक्षणासाठी असलेला एक राजा म्हणजे छ. शिवाजी महाराज होते. शिवभक्तांची इच्छा, भावना व मागणी होती, या गडावरील अतिक्रमण हटले पाहिजे. परंतु आम्ही छ. शिवाजी महाराजांचे आदर्श डोळ्यासमोर ठेवून आम्ही हे सरकार स्थापन केले. सातारा जिल्हाधिकारी व पोलिस अधिक्षक यांचे मनापासून अभिनंदन करतो. न्यायालयाने जो निवाडा दिला होता, त्यानुसार प्रतापगडावरील अतिक्रमण काढण्यात आले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे तुतारीच्या निनादात जोरदार स्वागत करण्यात आले. छ. शिवाजी महाराज यांच्या आश्वारूढ पुतळ्याचे दर्शन करत पुष्पवृष्टी करण्यात आली. तसेच आई भवानी मातेची आरतीही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. सूत्रसंचालन मिथून माने यांनी केले.
स्थानिक बातम्या
महायुतीला टक्कर देण्यासाठी भाजप वगळून समविचारी पक्षांशी युती करू.... शशिकांत शिंदे
- Wed 30th Nov 2022 06:02 pm
वडुज पोलीस ठाणे हद्दीतुन नागरिकांचे गहाळ झालेले सुमारे साडेचार लाख रुपये किंमतीचे एकुण २४ मोबाईल हस्तगत
- Wed 30th Nov 2022 06:02 pm
निवृत्त शिक्षकाच्या प्रकरणात साताऱ्यात वरिष्ठ सहाय्यक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात
- Wed 30th Nov 2022 06:02 pm
पुसेसावळीतील सावकारी च्या 'उदय' मुळे कळंबीतील एक कुटुंब 'अस्त' होण्याच्या मार्गावर...
- Wed 30th Nov 2022 06:02 pm
कुसुंबी गणात मंत्री शिवेंद्रराजेंचा करिष्मा चालणार
- Wed 30th Nov 2022 06:02 pm
फलटण तालुक्यात शिवसेना एकनाथ शिंदे गट आता होणार प्रबळ दावेदार.
- Wed 30th Nov 2022 06:02 pm
संबंधित बातम्या
-
पुसेसावळीतील सावकारी च्या 'उदय' मुळे कळंबीतील एक कुटुंब 'अस्त' होण्याच्या मार्गावर...
- Wed 30th Nov 2022 06:02 pm
-
फलटण शहरचे पोलीस निरीक्षक हेमंतकुमार शहा यांची तडकाफडकी बदली
- Wed 30th Nov 2022 06:02 pm
-
वडूज येथील रास्तभाव दुकानाबाबत दोष आढळल्याने नोटीस.
- Wed 30th Nov 2022 06:02 pm
-
औंध पोलिस ठाण्याचे कारभारी मतेंवर गोरे अंकुश ठेवणार? कि पोलिस अधीक्षक दोषी ठरवणार?
- Wed 30th Nov 2022 06:02 pm
-
जिल्हा परिषद नगररचना विभागात रंगली सामूहिक बिर्याणीची पार्टी.
- Wed 30th Nov 2022 06:02 pm
-
अजंठा चौकात टपरी चालकाचे नगरपालिकेला आव्हान
- Wed 30th Nov 2022 06:02 pm
-
सातारा जिल्हा पोलीस क्रीडा प्रबोधिनीमधील ०३ खेळाडुंची राष्ट्रीय स्पर्धेकरीता महाराष्ट्र संघातुन निवड
- Wed 30th Nov 2022 06:02 pm
-
औंध ग्रामीण रूग्णालयातील ऑक्सिजन वर असलेल्या व्यवस्थेने घेतला नवजातचा बळी?
- Wed 30th Nov 2022 06:02 pm












