रणजीतसिंह नाईक निंबाळकर महाराष्ट्राच्या राज्कारणात भविष्यात मोलाची कामगिरी करणार.: केंद्रीय मंत्री ना. अमित शहा यांची पुष्टी.

फलटण :  नुकत्याच पार पडलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीला संपूर्ण महाराष्ट्रात यश संपादन करता आले आणि काँग्रेसचा बालेकिल्ला असणारा सातारा जिल्ह्यात आठही उमेदवार माहितीचे विजयी झाले यामध्ये माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा मोलाचा वाटा आहे.

 फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघांमधून महायुतीच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजित पवार गट चे उमेदवार श्री सचिन सुधाकर पाटील यांना विजयी करण्यामध्ये रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे लोकसभा निवडणुकीत त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले तरीसुद्धा विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांनी भाजप आणि महायुतीच्या मित्र पक्षांना सोबत घेऊन प्रचाराची धुरा स्वतः सांभाळली. आणि मागील 29 वर्ष सत्तेत असणाऱ्या राजे गटाला पराभवाचा धक्का दिला. 

 या कार्याची दखल घेऊन भविष्यामध्ये महाराष्ट्राच्या राजकारणात समाजकारणात रणजीत सिंह नाईक निंबाळकर यांना महत्त्वाची भूमिका पार पाडावी लागणार आहे असे म्हणत रणजीत सिंह नाईक निंबाळकर यांना महाराष्ट्राच्या राजकारणात सदैव सक्रीय राहण्याचे संकेत केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी दिले आहेत. यामुळे फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघात विकासाच्या अनुषंगाने सक्रिय राहण्यास रणजीत सिंह नाईक निंबाळकर यांचा आत्मविश्वास वाढला आहे. या अनुषंगाने फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचा विकास नक्कीच उत्तम रीतीने होईल असा आत्मविश्वास सर्वसामान्य नागरिकांना वाटत आहे

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त