आले व्यापाऱ्यांनो सावधान शेतीमालाचे आल्याचे नवे जुने वर्गीकरण करू नका, अन्यथा अनुज्ञप्ती रद्द होईल!

 पुसेगाव : यावर्षी आले व्यापाऱ्याकडून शेतकऱ्याचे आले खरेदी करताना नवे जुने असे भाग पाडले जाऊन व्यापाऱ्याकडून शेतकऱ्यांची होत असलेली पिळवणूक थांबवण्याची मागणी भारतीय किसान संघाचे अध्यक्ष,उपाध्यक्ष  यांनी सातारा शेती उत्पन्न बाजार समितीकडे दिनांक २/९/२२ रोजी केली होती. त्यास अनुसरून बाजार समितीने आले व्यापाऱ्यांनी नवे जुने आल्याचा वर्गीकरण दराचा पाडलेला भाग थांबवावा अन्यथा आपली व्यापारी लायसन्स बंद करण्याची नोटीसाद्वारे ताकीद दिली आहे.


 भारतीय किसान संघ यांनी सातारा बाजारात समितीकडे दिलेल्या पत्रामध्ये म्हटले आहे की, सातारा तालुक्यासह सर्व जिल्ह्यातील आले व्यापाऱ्यांनी आले खरेदी करताना नवा व जुना असे मालाचे वर्गीकरण करण्याची प्रथा चालू केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात आर्थिक पिळवणूक होत असून, त्यामुळे आले पिकासाठी केलेला उत्पादनाचा खर्च सुद्धा निघत नाही, आपण शेतीमाल आले खरेदी करताना आलेमाल नवा किंवा जुना असे वर्गीकरण करू नये,त्या मालाची प्रत पाहून त्याचा योग्य दर करून खरेदी करावा, कारण यापूर्वी जुना नवा असा कोणताही नियम प्रचलित नव्हता व नाही. तरी माल खरेदी बाबत योग्य ती काळजी घ्यावी. याबाबत बाजार समिती कडे अशा प्रकारची कुठलीही शेतकऱ्यांची तक्रार आल्यास आपले अनुज्ञप्ती रद्द करण्यात येईल असा इशारा सातारा बाजार समितीच्या वतीने देण्यात आला आहे.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त