सुरूचि महिला ग्रंथालयाचा सुवर्ण महोत्सव सोहळा आनंदात संपन्न

कराड : सुरूचि महिला ग्रंथालयाला ५० वर्षे पुर्ण झाली. या निमित्ताने सुवर्ण महोत्सवी आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष सुलोचना विष्णू भिसे मॅडम (मुख्याध्यापिका कन्याशाळा, मलकापूर) व प्रमुख पाहुणे म्हणून संजय शिवाजीराव इंगवले (संचालक पुणे विभागीय ग्रंथालय संघ) तसेच प्रमुख उपस्थिती म्हणून आदरणीय यशवंतरावजी चव्हाण साहेब ग्रंथालय संघाचे अध्यक्ष संजय पिसाळ साहेब व सर्व ग्रंथालय संघाचे सदस्य, कराड नगरीच्या माजी नगराध्यक्षा रोहिणी शिंदे व माजी नगरसेवक विजय वाटेगावकर तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.


 ग्रंथालयात मा. यशवंतराव चव्हाण साहेब, संस्थापिका श्रीमती इंदुमती बेलापुरे आणि सरस्वती पूजन व दिप प्रज्वलन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करून कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. पुढील कार्यक्रम अक्षयपात्र हॉल येथे घेण्यात आला. मानचिन्ह आणि रोप देऊन मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. कार्यक्रमात श्री. संजय इंगवले सरांनी वाचन संस्कृतीचे संवर्धन या विषयावर व्याख्यान दिले, तसेच सौ. सुलोचना भिसे मॅडम यांनी ग्रंथालयाबद्दल मनोगत व्यक्त केले. ग्रंथालयाचे बालवाचक शौर्य बेलापुरे, अन्वी कुंडलकर, झील बेलापुरे, माही पत्की, नुपुर कुलकर्णी, अक्षरा रंगाटे तसेच ग्रंथालयाचे वाचक सभासद श्रीमती सुनिता अयाचित, दस्तगिर शिकलगार व संगिता चिवटे यांनी देखील मनोगत व्यक्त केले. दत्तक शाळा योजने अंतर्गत कै. का. ना. पालकर आदर्श विद्यालय कराडच्या मुख्याध्यापिका वर्षाराणी पवार यांचाही सत्कार करण्यात आला. 

कार्यक्रमाचे औचित्य साधून ग्रंथालयातील २० ते २५ वर्षे अखंड व नियमित वाचक सभासद अपर्णा जोशी, अर्चना चिकुर्डेकर, निलिमा जाधव, स्वाती भागवत अशा ३५ सभासदांचा रोप देऊन सत्कार करण्यात आला. या सत्कारात ग्रंथालयाच्या स्थापने पासून सभासद असणाऱ्या आश्विनी वझे यांचा मानचिन्ह व रोप देऊन विशेष सत्कार करण्यात आला. ग्रंथालयाच्या अध्यक्षा शर्वरी बेलापुरे यांनी ग्रंथालयाचा ५० वर्षाचा प्रवास सांगून प्रस्तावना संस्थेचा परिचय करून दिला. 


कार्यक्रमाचे सुत्रसंचालन संस्थेच्या उपाध्यक्षा ईरा बेलापुरे यांनी केली. कार्यक्रमाचे नियोजन व व्यवस्थापन ग्रंथपाल कोमल कुंडलकर, सहाय्यक नेहा गरूड व लिपिक वर्षा यादव यांनी सुव्यवस्थित केले. ग्रंथालयाच्या अध्यक्षा शर्वरी बेलापुरे यांनी पुढील वर्षभरात ग्रंथालयाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या उपक्रमाविषयी सांगितले व मान्यवरांचे आभार व्यक्त केले. संस्थेचे संचालक मंडळातील सदस्य वर्षा कुलकर्णी व संगिता चिवटे यांनी वर्षभरात घेतल्या जाणाऱ्या उपक्रमाची झलक दाखवून या सुवर्ण महोत्स्वी आनंद मेळाव्याची सांगता केली.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त