सुट्टीतही पटपडताळणी, चहा-पाणीची चर्चा; महाबळेश्वर तालुक्यात शिक्षण विभागावर प्रश्नचिन्ह
Satara News Team
- Sat 18th Apr 2026 02:16 pm
- बातमी शेयर करा
महाबळेश्वर : महाबळेश्वर तालुक्यात राबविण्यात आलेल्या विशेष पटपडताळणी मोहिमेमुळे सध्या शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ उडाली असून, या प्रक्रियेदरम्यान काही गंभीर बाबी समोर आल्याची चर्चा आहे.
माहितीनुसार, सहाय्यक प्रतिनिधींनी विविध शाळांमध्ये जाऊन प्रत्यक्ष तपासणी केली. काही ठिकाणी सकाळी ८.३० वाजताच अचानक भेट देऊन तपासणी करण्यात आली, ज्यामुळे शिक्षक व विद्यार्थ्यांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.
विशेष बाब म्हणजे, काही शाळा वार्षिक नियोजननुसार सुट्टीवर होत्या, तर काही शाळांना मिड-डे मीलसाठी गॅसच्या अडचणीमुळे सुट्टी जाहीर करावी लागली होती. तरीदेखील अशा शाळांमध्ये तपासणीसाठी भेट देण्यात आल्याने शिक्षक वर्गात नाराजी पसरली आहे.
याचदरम्यान, दोन दिवसांनी शिक्षण अधिकाऱ्यांनी काही शाळांना भेट देऊन पाहणी केली. उपस्थिती नोंदी, शालेय कामकाज व इतर बाबींची तपासणी करण्यात आली.
दरम्यान, काही ठिकाणी भेटीनंतर ‘चहा-पाणी’च्या नावाखाली रक्कम मागितल्याची चर्चा समोर येत आहे. या बाबत अधिकृत पुष्टी अद्याप झालेली नसली तरी, या चर्चेमुळे शिक्षण विभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
महाबळेश्वर तालुक्यातील शिक्षक व शिक्षणप्रेमी नागरिकांकडून पुढील मागण्या करण्यात येत आहेत:
नियोजित वार्षिक सुट्ट्यांच्या काळात तपासणी टाळावी
तपासणीसाठी येणाऱ्या अधिकाऱ्यांनी पूर्वसूचना देणे बंधनकारक करावे
‘चहा-पाणी’च्या नावाखाली होत असलेल्या कथित प्रकारांची सखोल व निष्पक्ष चौकशी करावी
दोषी आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करावी
शाळांमध्ये अनावश्यक दबाव निर्माण होणार नाही, याची दक्षता घ्यावी
एकूणच, या संपूर्ण प्रकारामुळे शिक्षक वर्गात असंतोषाचे वातावरण निर्माण झाले असून, प्रशासनाने तातडीने लक्ष घालून वस्तुस्थिती स्पष्ट करावी, अशी जोरदार मागणी पुढे येत आहे.
‘सातारा न्यूज’मुळेच हा धडाकेबाज खुलासा समोर आला आहे.
स्थानिक बातम्या
विठ्ठलाच्या ओढीने धावणाऱ्या पावलांना बळ देणारा चरणसेवा उपक्रम
- Sat 18th Apr 2026 02:16 pm
माथेरानला चौकशी समिती, महाबळेश्वरला मोकळे रान? शासनाच्या दुहेरी भूमिकेवर संताप
- Sat 18th Apr 2026 02:16 pm
रयतराजच्या दणक्याने चड्डी बनियान डॉक्टर निलंबित तर दुसऱ्याची चौकशी.....
- Sat 18th Apr 2026 02:16 pm
पालखी सोहळा स्वागतासाठी सातारा जिल्हा परिषद सज्ज- डॉक्टर प्रियाताई शिंदे
- Sat 18th Apr 2026 02:16 pm
नो रिअल ....हो! अगदी खरं आहे. रील च्या चक्कर मध्ये आपण रिअल राहिलो नाही.
- Sat 18th Apr 2026 02:16 pm
संबंधित बातम्या
-
माथेरानला चौकशी समिती, महाबळेश्वरला मोकळे रान? शासनाच्या दुहेरी भूमिकेवर संताप
- Sat 18th Apr 2026 02:16 pm
-
पदभार स्वीकारताच वेण्णा लेकवर उतरले PI हर्षद गालिंदे; वाहतूक कोंडीवर तात्काळ कारवाई
- Sat 18th Apr 2026 02:16 pm
-
रयतराजच्या दणक्याने चड्डी बनियान डॉक्टर निलंबित तर दुसऱ्याची चौकशी.....
- Sat 18th Apr 2026 02:16 pm
-
टीईटी सक्ती संदर्भात श्रीमंत छत्रपती खासदार उदयनराजे भोसले यांना अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाचे निवेदन
- Sat 18th Apr 2026 02:16 pm
-
खटाव (वडूज)चं तहसिल कार्यालय काय करायलंय?
- Sat 18th Apr 2026 02:16 pm
-
महाबळेश्वरचा ऐतिहासिक आठवडे बाजार आता छत्रपती संभाजी महाराज पार्किंगमध्ये
- Sat 18th Apr 2026 02:16 pm
-
फलटणला अन्न व औषध प्रशासन सातारा यांच्या कारवाईची प्रतीक्षा.
- Sat 18th Apr 2026 02:16 pm











