साताऱ्यात तडीपार गुंडाकडून सहा मोटरसायकल चोरीचे गुन्हे उघड करण्यात शाहूपुरी पोलिसांना यश.
Satara News Team
- Tue 9th Aug 2022 08:58 am
- बातमी शेयर करा
शाहूपुरी : सातारा शहरात मोटरसायकल चोरीचे गुन्हे वारंवार घडत असल्याने पोलीस अधीक्षक अजयकुमार बंसल यांनी शाहूपुरी पोलिसांना मोटरसायकल चोरीतील सराईत आरोपींची माहिती संकलित करून गुन्हे उघडकीस आणण्याच्या सूचनात केल्या नंतर शाहूपुरी गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस आरोपींची माहिती घेत असताना त्यांना तडीपार गुंड हे त्यांच्या राहत्या घराच्या परिसरात फिरत असून त्यांनी मोटर सायकल चोरी केल्या आहेत अशी गोपनीय माहिती मिळाली.. पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे तडीपार चोरट्यांच्या घरी जाऊन तपासणी केली असताना सदरचे गुंड झोपडपट्टीतील गल्लीबोळाचा आणि डोंगराचा फायदा घेऊन पळून जाण्यात यशस्वी झाले.. हे गुंड मुंबई येथे पळून जाण्याच्या तयारीत असताना त्यांना सातारा एसटी स्टँड परिसरात पाठलाग करून ताब्यात घेत त्यांच्यावर तडीपार कारवाईचे भंग केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.. त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी 15 दिवसांपूर्वी सातारा शहरातून चोरी केलेल्या 4 मोटरसायकल जप्त करण्यात आली आहे.. सदर चोरटा हा मोटरसायकल निव्वळ हौसेने फिरवण्यासाठी चोरी करत असल्याचे त्याने पोलिसांना सांगितले असल्याची माहिती दिली आहे.. या प्रकरणीविकास मुरलीधर मुळे आणि ऋत्विक धनंजय पंडित या दोघांना शाहूपुरी पोलिसांनी अटक केली आहे..
स्थानिक बातम्या
पत्रकारांना दलाल म्हणणाऱ्या मुजोर वाहतूक निरीक्षक शाहरुख खानचे निलंबन
- Tue 9th Aug 2022 08:58 am
सातारा तालुक्यात चोरीच्या दुचाकींचा पर्दाफाश; 4 वाहने जप्त : सातारा तालुका पोलिसांची कारवाई
- Tue 9th Aug 2022 08:58 am
मसूर पूर्व भागातील शेतकरी संतप्त; पाण्यासाठी शीत युद्ध सुरू
- Tue 9th Aug 2022 08:58 am
सत्यजित केसरी पर्व ४ थे’ ला बैलगाडा शौकीनांचा प्रचंड प्रतिसाद
- Tue 9th Aug 2022 08:58 am
वडगाव निं. अल्पवयीन मुलीच्या गर्भपात प्रकरणातील डॉ. योगेश नरुटे अखेर पोलिसांच्या ताब्यात
- Tue 9th Aug 2022 08:58 am
पोलीस अधीक्षक निखिल पिंगळेंनी पदभार स्वीकारताच अवैध धंद्यांवर छापे ; १२ जणांवर गुन्हे
- Tue 9th Aug 2022 08:58 am
संबंधित बातम्या
-
फलटण ग्रामीण पोलिसांनी चार पिस्टल बहाद्दर केले जेरबंद.
- Tue 9th Aug 2022 08:58 am
-
सातारा तालुक्यात चोरीच्या दुचाकींचा पर्दाफाश; 4 वाहने जप्त : सातारा तालुका पोलिसांची कारवाई
- Tue 9th Aug 2022 08:58 am
-
शिवीगाळ व धमकी प्रकरणातील फरार आरोपी असीम आतारच्या मुसक्या फलटण पोलिसांनी आवळल्या
- Tue 9th Aug 2022 08:58 am
-
वडगाव निं. अल्पवयीन मुलीच्या गर्भपात प्रकरणातील डॉ. योगेश नरुटे अखेर पोलिसांच्या ताब्यात
- Tue 9th Aug 2022 08:58 am
-
वाठार (निंबाळकर) येथील रवींद्र खोपडे यांचा खाजगी सावकारांच्या त्रासाने संसार उध्वस्त.
- Tue 9th Aug 2022 08:58 am











