वडूज मध्ये एकाच रात्री पाच घरफोड्या

१५ तोळे दागिन्यांसह २० हजार रुपयांची रोख रक्कम लंपास

वडूज: वडूज शहरातील पेडगाव रस्त्यावरील कर्मवीर नगर परिसरात अज्ञात चोरट्यांनी शुक्रवारी रात्री पाच घरांसह एक अंगणवाडी शाळा फोडली. चोरीच्या घटनेत चोरट्यांनी संगीता देविदास कोळी यांच्या बंद घराचे दारू उचकटून घरातील १५ तोळे सोन्याच्या दागिन्यांसह पंधरा हजार रुपयाची रोख रक्कम लंपास केली. तसेच अन्य चार बंद घरे फोडून चोरट्यांनी २० हजार रुपयांच्या इलेक्ट्रिक साहित्यासह पाच हजार रुपयांची रोख रक्कम चोरून नेली


. याबाबत घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार वडूज येथील पेडगाव रस्त्यावर कर्मवीर नगर येथे शुक्रवारी रात्री संगीता देविदास कोळी यांच्या राहत्या घराचे दाराचे कुलूप तोडून कडी कोयंडा उचकटून चोरट्यांनी घरात प्रवेश केला. घरातील लोखंडी कपाट उघडून त्याच्यामधील सुमारे आठ तोळे वजनाच्या सोन्याच्या बांगड्या, साडेपाच तोळी वजनाची मोहन माळ, एक तोळे वजनाची कर्णफुले असे सुमारे १५ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने लंपास केले. तसेच १५ हजार रुपयाची रोख रक्कमही चोरट्यांनी लंपास केल्याचे कोळी यांनी सांगितले. तसेच मुमताज नूरमहंमद शेख या वृदेच्या घराचे कुलूप उचटण्याचा प्रयत्न चोरट्यांनी केला. त्यावेळी जवळच घरात राहत असलेल्या सुरज भापकर या युवकाला बाहेरून दारावर काहीतरी मारत असल्याचा आवाज आल्याने त्याने खिडकी उघडली असता तीन ते चार जण अज्ञात चोरटे घराचे कुलूप उचकटत असल्याचे दिसले. त्यावेळी सुरज ने आरडाओरडा ग करताच चोरट्यांनी भापकर यांच्या खिडकीवर दगड मारून तेथून पोबारा केला. 

 चोरट्यांनी जवळच्याच करमारे कॉलनीतील हुतात्मा परशुराम विद्यालयातील शिक्षक महादेव भोकरे यांच्या बंद घरात चोरी केली. त्यांच्या दाराचे कुलूप तोडून कडी कोंडा उचकटून चोरट्यांनी घरात प्रवेश केला. घरातील लोखंडी कपाट उघडून त्यामधील साहित्याची उलथापालथ केली. येथून चोरट्यांनी पाच हजार रुपयांची रोख रक्कम चोरून नेली. त्यांच्या समोरच राहत असलेल्या रोहिदास कदम यांच्या घराचे कुलूप व कडी कोयंडा उचकटून लोखंडी कपाटातील साहित्याची उलथापालथ केली. 

याशिवाय इलेक्ट्रिक व्यावसायिक किशोर बाबुराव पवार यांच्या बंद खोलीच्या दाराचे कुलूप तोडून चोरट्यांनी सुमारे २० हजार रुपये किमतीचे विजेचे साहित्य लांबविले. नजीकच असलेल्या एका अंगणवाडीच्या खोलीचे कुलूप तोडून चोरट्यांनी चोरीचा प्रयत्न केला. 

 घटनास्थळी वडूज पोलीस ठाण्याचे निरीक्षक घनश्याम सोनवणे व सहकाऱ्यांनी भेट दिली. अधिक तपासासाठी साताऱ्याहून ठसेतज्ज्ञ व श्वानपथक पथक आले होते



चोरट्यांकडून बंद घरे लक्ष्य... चोरी झालेल्या काही घरांपैकी कोळी व शेख या कुटुंबातील अन्य सदस्यांकडे झोपण्यासाठी गेल्या होत्या. तर भोकरे व कदम हे कामानिमित्त पर्व परगावी होते. त्यामुळे त्यांची घरे बंद होती. चोरट्यांनी नेमका हाच डाव साधत बंद घरांना लक्ष केले. शिवाय सर्वच ठिकाणी चोरींची पद्धत एकच असल्याचे दिसून येते.
चोरट्यांनी चोरी केलेल्या घरातील अस्थव्यस्थ विस्कटलेले कपाटातील साहित्य, घटनास्थळी सातारा येथील ठसे तज्ज्ञ, श्वानपथक तपास करताना ( छाया: विक्रमसिंह काळे)
आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त