खुनाच्या गुन्हयातील फरारी आरोपी बिहार राज्यातून केला जेरबंद

पुसेगाव : पुसेगाव पोलीस ठाणेस डिसेंबर २०२१ मध्ये मजुर राजू चंद्रबली पटेल वय ३२ वर्षे व्यवसाय गवंडी काम मूळ रा. चंद्रबली, सिरजमदेई, देबारिया, उत्तरप्रदेश याचा कंत्राटदार मेवालाल चौहान व इतर साथीदारांनी पैशाच्या वादातून निर्धुनपणे मारहाण करून खुन केला होता व येरळा नदीपात्रात त्याचे प्रेत गाढून मुख्य आरोपी मेवालाल चौहान व इतर आरोपी हे गुन्हा करून फरार झालेले होते. त्याबाबत पुसेगाव पोलीस ठाणेस गु.र.नं. १०/२०२२ भा.द.वि. कलम ३०२, २०१, १४३, १४७, १४८, १४९, ५०४, ५०६ प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आलेला होता. त्यावेळी इतर ३ आरोपी पकडण्यात पुसेगाव पोलीस ठाणेस यश आलेले होते. मुख्य आरोपी व इतर आरोपी मिळून न आलेने मागील दोन वर्षापासून त्यांचे तपासकामी पोलीस तपास पथक वेळोवेळी परराज्यात जावून शोध घेवूनही आरोपी मिळून येत नव्हते. पोलीस अधीक्षक सातारा, समीर शेख यांनी पाहीजे आरोपींचा शोध घेण्याबाबत वेळोवेळी मार्गदर्शन करून त्यांना पकडण्याबाबत सुचना दिल्या होत्या. त्याआधारे तपास पथकाकडून तांत्रिक व गोपनीय माहीतीच्या आधारे मागील दोन वर्षापासून चालू असलेल्या तपासाला अखेर यश प्राप्त होवून मुख्य आरोपी नामे मेवालाल जवाहर चौहान रा. विहार हा शिवान जिल्हयात असलेची माहीती प्राप्त होताच पुसेगाव येथून तपास पथकाने बिहार राज्यात जावून तेथे सापळा रचला. सिताफिने आरोपीचा शोध घेवून त्याचेकडे कौशल्यपूर्ण सखोल चौकशी करून त्यास अटक केली आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास स. पो. नि. संदीप शितोळे व आशिष कांबळे हे करीत आहेत.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला