सातारा जिल्ह्यातील 22 पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या

सातारा ; सातारा जिल्ह्यातील 22 पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या बुधवारी (दि. 11) रोजी सायंकाळी उशिरा झाल्या आहेत. त्यामध्ये सातारा शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक विठ्ठल अरुण शेलार यांची मसूरला बदली झाली आहे.
तळबीड पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक जयश्री पाटील यांची सातारा जिल्हा वाहतूक शाखेत, तर कराड शहर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल वरोटे यांची तळबीड पोलीस ठाणे येथे प्रभारी म्हणून बदली करण्यात आली आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक अजय गोरड यांना उंब्रज पोलीस ठाणे येथे मुदतवाढ मिळाली आहे.

सातारा शहर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश माने यांची पाचगणी पोलीस ठाणे येथे प्रभारी, सातारा स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष तासगावकर यांची मेढा पोलीस ठाणे येथे प्रभारी, सातारा स्थानिक गुन्हे शाखेचे रमेश गर्जे यांची भुईंज पोलीस ठाणे येथे प्रभारी, सातारा तालुका पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिजीत चौधरी यांची ढेबेवाडी पोलीस ठाणे प्रभारी, शाहूपुरी पोलीस ठाण्याचे सपोनि अभिजीत यादव यांची सातारा शहर वाहतूक नियंत्रण शाखेत प्रभारी, ढेबेवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष पवार यांची सातारा येथील स्थानिक गुन्हे शाखा, सातारा येथील नियंत्रण कक्षातील सहाय्यक पोलीस निरीक्षक धोंडीराम वाळवेकर यांची सातारा येथील मानवी संसाधन पोलीस कल्याण येथे बदली झाली आहे.

पाचगणी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश पवार यांची सातारा येथील आर्थिक गुन्हे शाखा, सातारा शहर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप मोरे यांची कराड शहर पोलीस ठाणे, कराड शहर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमित बाबर यांची शाहुपुरी पोलीस ठाणे, वाई पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र तेलतुंबडे यांची बोरगाव पोलीस ठाणे येथे प्रभारी, मेढा पोलीस ठाण्याचे अमोल माने यांची सातारा येथील सायबर पोलीस ठाणे, कराड शहर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय गोडसे यांची फलटण ग्रामीण पोलीस ठाणे, साताऱ्यातील नियंत्रण कक्षातील सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजीराव विभूते यांची कराड शहर पोलीस ठाणे, भुईंज पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष कांबळे यांची पोलीस उपविभागीय कार्यालय वाई विभाग येथे वाचक, पुसेगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शितोळे यांची सातारा येथील जिल्हा विशेष शाखेत, सातारा येथील भरोसा सेलचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिता दिनकर यांची सातारा तालुका पोलीस ठाणे आणि सातारा येथील नियंत्रण कक्षातील शाहीर पोलीस निरीक्षक आरती नांदेकर यांची सातारा येथील स्थागुशा अंतर्गत भरोसा सेल येथे बदली झाली आहे.

आम्हाला जोडण्यासाठी

स्थानिक बातम्या

वडगाव निं. अल्पवयीन मुलीच्या गर्भपात प्रकरणातील डॉ. योगेश नरुटे अखेर पोलिसांच्या ताब्यात

वडगाव निं. अल्पवयीन मुलीच्या गर्भपात प्रकरणातील डॉ. योगेश नरुटे अखेर पोलिसांच्या ताब्यात

पोलीस अधीक्षक निखिल पिंगळेंनी पदभार स्वीकारताच अवैध धंद्यांवर छापे ; १२ जणांवर गुन्हे

पोलीस अधीक्षक निखिल पिंगळेंनी पदभार स्वीकारताच अवैध धंद्यांवर छापे ; १२ जणांवर गुन्हे

राजीनाम्याचा लेटर बॉम्ब; साताऱ्यात शिंदे शिवसेनेत खळबळ

राजीनाम्याचा लेटर बॉम्ब; साताऱ्यात शिंदे शिवसेनेत खळबळ

अक्षय तृतीया विशेष : क्रांतिसूर्य महात्मा बसवेश्वर

अक्षय तृतीया विशेष : क्रांतिसूर्य महात्मा बसवेश्वर

फलटण पंचायत समिती सभापती निवडणुकी साठी  निवडणूक निर्णय अधिकारी सौ. प्रियांका आंबेकर( प्रांत ) तथा उपविभागीय अधिकारी फलटण यांचे ऐवजी दुसरा अधिकारी द्या:शिवसेना जिल्हाप्रमुख श्री .चंद्रकांत दादा जाधव.

फलटण पंचायत समिती सभापती निवडणुकी साठी निवडणूक निर्णय अधिकारी सौ. प्रियांका आंबेकर( प्रांत ) तथा उपविभागीय अधिकारी फलटण यांचे ऐवजी दुसरा अधिकारी द्या:शिवसेना जिल्हाप्रमुख श्री .चंद्रकांत दादा जाधव.

पुसेसावळी दुरक्षेत्र परिसरात अवैध धंद्यांचा 'अंधार' आणि उपनिरीक्षकांची 'सुपरसोनिक' नेत्रे?

पुसेसावळी दुरक्षेत्र परिसरात अवैध धंद्यांचा 'अंधार' आणि उपनिरीक्षकांची 'सुपरसोनिक' नेत्रे?

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला