वॉचमनचा मोबाईल व पैसे हिसकावून अज्ञाताचा पोबारा शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
Satara News Team
- Tue 2nd Aug 2022 12:59 pm
- बातमी शेयर करा
जबरी चोरीच्या घटना वृद्धांसोबत... शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पोवईनाका येथे रात्री 8 वाजण्याच्या सुमारास पायी चालत निघालेल्या वृद्ध महिलेची पर्स हिकावून अज्ञाताने पोबारा केला होता. तसेच इतर भागातही वृद्धासोबत अशा घटना घडत आहे. यामुळे या अज्ञात चोरटय़ाला जेरबंद करणे गरजेचे असताना पोलीसांकडून ठोस पावले उचली जात नसल्याने अशा घटनात वाढ झाली आहे.
सातारा : यादवगोपाळ पेठेतील बोकील हॉस्पिटलच्या शेजारून पायी चालत निघालेल्या 65 वर्षीय वॉचमनचा मोबाईल व 2 हजार रूपये हिसकावून नेल्याची घटना घडली. आनंद गुंडू माने(रा. मंगळवार पेठ सातारा) असे त्यांचे नाव आहे. त्यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. शहर व शाहूपुरी हद्दीत जबरी चोरीचे प्रकार वाढत असताना पोलिसांकडून ठोस कारवाई होत नसल्याने अज्ञात चोरटय़ाला पाठबळ मिळत आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, आनंद माने हे वॉचमनचे काम करतात. सोमवार दि. 1 ऑगस्ट रोजी 11 वाजण्याच्या सुमारास यादव गोपाळ पेठेतून पायी चालत येत होते. यावेळी बोकील हॉस्पिटलच्या शेजारी आल्यावर पाठीमागून दुचाकीवर अज्ञात आले. त्यांनी आनंद यांच्या हातातील मोबाईल हिसकवला. तसेच त्याच्या खिशात हात घालून 2 हजार रूपये हिसकावून पोबारा केला. अचानक घडलेल्या या घटनेमुळे आनंद चांगलेच घाबरले. त्यांनी आरडाओरडा केला. परंतु कोणतीही मदत मिळाली नाही. यामुळे त्यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात जावून अज्ञाताविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. या गुह्याचा अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक यादव करत आहेत.
mobile
crime
स्थानिक बातम्या
मसूर पूर्व भागातील शेतकरी संतप्त; पाण्यासाठी शीत युद्ध सुरू
- Tue 2nd Aug 2022 12:59 pm
सत्यजित केसरी पर्व ४ थे’ ला बैलगाडा शौकीनांचा प्रचंड प्रतिसाद
- Tue 2nd Aug 2022 12:59 pm
वडगाव निं. अल्पवयीन मुलीच्या गर्भपात प्रकरणातील डॉ. योगेश नरुटे अखेर पोलिसांच्या ताब्यात
- Tue 2nd Aug 2022 12:59 pm
पोलीस अधीक्षक निखिल पिंगळेंनी पदभार स्वीकारताच अवैध धंद्यांवर छापे ; १२ जणांवर गुन्हे
- Tue 2nd Aug 2022 12:59 pm
राजीनाम्याचा लेटर बॉम्ब; साताऱ्यात शिंदे शिवसेनेत खळबळ
- Tue 2nd Aug 2022 12:59 pm
अक्षय तृतीया विशेष : क्रांतिसूर्य महात्मा बसवेश्वर
- Tue 2nd Aug 2022 12:59 pm
संबंधित बातम्या
-
शिवीगाळ व धमकी प्रकरणातील फरार आरोपी असीम आतारच्या मुसक्या फलटण पोलिसांनी आवळल्या
- Tue 2nd Aug 2022 12:59 pm
-
वडगाव निं. अल्पवयीन मुलीच्या गर्भपात प्रकरणातील डॉ. योगेश नरुटे अखेर पोलिसांच्या ताब्यात
- Tue 2nd Aug 2022 12:59 pm
-
वाठार (निंबाळकर) येथील रवींद्र खोपडे यांचा खाजगी सावकारांच्या त्रासाने संसार उध्वस्त.
- Tue 2nd Aug 2022 12:59 pm
-
शिक्षकाने केला विद्यार्थिनीला अश्लील मेसेज
- Tue 2nd Aug 2022 12:59 pm
-
पुसेसावळी दुरक्षेत्र परिसरात अवैध धंद्यांचा 'अंधार' आणि उपनिरीक्षकांची 'सुपरसोनिक' नेत्रे?
- Tue 2nd Aug 2022 12:59 pm
-
पोक्सो तील आरोपीस २० वर्ष सश्रम कारावास व रु ५००००/- दंडाची शिक्षा.
- Tue 2nd Aug 2022 12:59 pm












