राजे उमाजी नाईक जयंतीवरून मार्डी ग्रामपंचायत विरोधात समाजबांधव आक्रमक

माण  : आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांचा जन्म लक्ष्मीबाई व दादोजी नाईक खोमणे यांच्या पोटी ७ सप्टेंबर १७९१ रोजी पुणे जिल्ह्यातील किल्ले पुरंदर येथे झाला.उमाजी नाईक हे ७ सप्टेंबर १७९१ ते ३ फेब्रुवारी १८३२ या काळात एक भारतीय क्रांतिकारक होते.ज्यांनी ईस्ट इंडिया कंपनीच्या राजवटीला आवाहन दिले आणि १८२६ ते १८३२ या काळात भारतातील ब्रिटिश सत्तेविरुद्ध लढा दिला. मराठा महासंघाच्या पत्नानंतर त्यांनी एक सैन्य उभे केले आणि कोल्हापूर,सातारा,सांगली पुणे व मराठवाडा या भागात आपली ताकद दाखवली.इंग्रजांविरुद्ध बंड करणाऱ्या आद्य क्रांतिकारकाला ३ फेब्रुवारी १८३२ रोजी फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. ते महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील इंग्रजांविरुद्ध जोरदार लढा उभारणार्‍यांपैकी एक होते. 


त्याच पार्श्वभूमीवर उमाजी नाईक यांची जयंती पुणे,दिल्ली,सांगोला तसेत राज्यभरातील शासकीय व निमशासकीय कार्यालयांमध्ये साजरी केली जाते. यामध्ये राजभवन,आणि महाराष्ट्र सदन दिल्ली सारख्या ठिकाणीही अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले जाते.राज्यातील सर्व ग्रामपंचायती,नगरपंचायतींमध्येही त्यांची जयंती पुष्पहार अर्पण करून तसेच अभिवादन करून साजरी करण्यात येते. परंतु माण तालुक्यातील मार्डी ग्रामपंचायत येथे उमाजी नाईक यांची जयंती ग्रामपंचायत अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीत साजरी करण्यात आली असल्याची माहिती समोर येत असल्याने रामोशी समाज चांगलाच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे.यामुळे ग्रामपंचायत अधिकारी तसेच प्रशासनाला थोर महापुरुषांच्या जयंती बद्दल कोणतेच भान राहिले नसल्याची चर्चा तालुक्यासह जिल्ह्यात रंगली आहे.इंग्रजाचे कर्दनकाळ आणि आद्य क्रांतिकारक राजे उमाजी नाईक यांची जयंती सुट्टीचा दिवस असला तरीही साजरी करण्याचे आदेश सामान्य प्रशासन विभाग,महाराष्ट्र शासन यांनी दिले आहेत.सोबत सबंधित शासन निर्णय आहे.परंतू ग्रामपंचायत अधिकारी,तत्पर सर्व सदस्य,काळजीवाहू बिनविरोध टीम यांनी दांडी मारून राजे उमाजी नाईक यांची जयंती साजरी केली नाही.बिनविरोध टीमला नक्की कोणत्या राष्ट्रीय पुरुषाचे वा समाजाचे वावडे आहे हे स्पष्टपणे दिसून येत आहे.याबाबत जाहीर निषेध व्यक्त करण्यात येत आहे आणि ही अक्षम्य चूक केल्याबद्दल कारवाईची मागणी करण्यात येत आहे.अन्यथा सर्व समाज बांधव आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.


याप्रकरणी राजेश चव्हाण,बाळकृष्ण चव्हाण,हणमंत चव्हाण,राम चव्हाण,सुरज चव्हाण हे समाजबांधव आक्रमक झाले असून त्यांनी संबंधितांवर कारवाईची मागणी केली आहे.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला