अँथलेटीक्स स्पर्धेत प्रवीण कचरे यांना सुवर्ण पदक

आ. महेश शिंदे यांच्या हस्ते सत्कार

वडूज :    येथील बस आगारात कार्यरत असणारे प्रवीण कचरे यांना विशाखापट्टणम येथे झालेल्या अखिल भारतीय परिवहन मंडळाच्या अँथलेटीक्स स्पर्धेत सुवर्ण पदक मिळाले आहे. सुवर्ण पदक पटकावले बद्दल आमदार महेश शिंदे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. याबाबत अधिक माहिती अशी की प्रवीण आत्माराम कचरे हे वडूज आगारात वाहतूक नियंत्रक पदावर ( पुसेगाव ) केबिन येथे कार्यरत आहेत. मूळचे खटाव तालुक्यातील काटेवाडी येथील रहिवाशी आहेत.

   विशाखापट्टणम येथे अखिल भारतीय परिवहन मंडळाच्या वतीने अँथलेटीक्स स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये श्री कचरे यांनी महाराष्ट्र परिवहन मंडळाच्या वतीने सहभाग घेतला होता. यमध्ये त्यांनी सुवर्ण पदक पटकावले. त्यांच्या या यशाबद्दल कोरेगव मतदार संघाचे आमदार महेश शिंदे यांनी त्यांचा सत्कार घेतला तसेच त्यांच्या यशाबद्दल वडुज आगाराच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी वडूज आगारचे व्यवस्थापक प्रताप पाटील, वाहतूक नियंत्रक गणेश राऊत, सूरज जगदाळे , विशाल लावंड यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त