हॉटेल व्यवसायिकाला हनीट्रॅप करून ४० लाखांची खंडणी मागणी; पाच जणांना दोन तासांत अटक

फलटण : गोड बोलून प्रेमाच्या जाळ्यात ओढत हॉटेल व्यवसायिकाला खोलीत अडकवून मारहाण करत ४० लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या सराईत टोळीचा फलटण शहर पोलिसांनी अवघ्या दोन तासांत पर्दाफाश करून पाच जणांना अटक केली आहे. या कारवाईमुळे शहरात खळबळ उडाली आहे.

फिर्यादी श्री. आनंद काशिनाथ दळवी  (रा. कापूरहोळ, ता. भोर, जि. पुणे) यांना एका महिलेने मोबाईलवर व्हॉट्सअॅप कॉल करून प्रेमाच्या जाळ्यात ओढले. त्यानंतर १३ फेब्रुवारी रोजी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास बुधवारी पेठ, फलटण येथील लॉजवर बोलावून घेतले. तेथे आरोपींनी कट रचून फिर्यादीला खोलीत अडकवले, शिवीगाळ व मारहाण करून “तुला बलात्काराच्या गुन्ह्यात अडकवू” अशी धमकी दिली.

आरोपींनी फिर्यादीकडून ४० लाख रुपयांची मागणी केली. त्यापैकी १ लाख १५ हजार रुपये रोख तसेच एटीएम व क्रेडिट कार्डद्वारे जबरदस्तीने पैसे घेतले. पुढे पुण्याला सोडण्याच्या बहाण्याने रस्त्यात गाडी अडवून फिर्यादीच्या गळ्यातील सुमारे २० तोळे वजनाची, अंदाजे ३० लाख रुपये किमतीची सोन्याची साखळीही काढून घेतल्याचे तक्रारीत नमूद आहे.

या प्रकरणी फलटण शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होताच वरिष्ठांच्या मार्गदर्शना खाली पोलिसांनी तत्काळ पथके तयार करून संशयितांचा शोध घेतला. दोन तासांच्या आत पोलिसांनी साहिल रवी तारे  (रा. दत्तनगर, फलटण), वैभव बाळासो सस्ते  (सस्तेवाडी , ता. फलटण), रोहन नवीन काकडे (मंगळवार पेठ, फलटण), विनायक बाळासो जाधव आणि राज राम बोके  (रा. माळवाडी पेठ, फलटण) यांना ताब्यात घेत अटक केली.

सदर कारवाई माननीय पोलिस अधीक्षक तुषार दोशी, अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर, उपविभागीय पोलीस अधीक्षक रणजीत सावंत ,उपविभागीय अधिकारी वडूज अतिरिक्त कार्यभार फलटण उपविभाग यांचे मार्गदर्शनाखाली फलटण शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरविंद काळे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन शिंदे पोलीस उपनिरीक्षक दिनेश शिंदे पोलीस अमलदार नानासो होले, नितीन सजगणे, संतोष नाळे ,जितेंद्र टिके, काकासो कर्णे,अतुल बडे, मुकेश घोरपडे ,महेश जगदाळे ,निखिल गायकवाड, जयदीप यादव, गणेश अवघडे, विक्रम कुंभार यांनी केलेली आहे

ही कारवाई वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली फलटण शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक व पथकाने केली असून पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक नितीन शिंदे करत आहेत.

आम्हाला जोडण्यासाठी

स्थानिक बातम्या

फलटण पंचायत समिती सभापती निवडणुकी साठी  निवडणूक निर्णय अधिकारी सौ. प्रियांका आंबेकर( प्रांत ) तथा उपविभागीय अधिकारी फलटण यांचे ऐवजी दुसरा अधिकारी द्या:शिवसेना जिल्हाप्रमुख श्री .चंद्रकांत दादा जाधव.

फलटण पंचायत समिती सभापती निवडणुकी साठी निवडणूक निर्णय अधिकारी सौ. प्रियांका आंबेकर( प्रांत ) तथा उपविभागीय अधिकारी फलटण यांचे ऐवजी दुसरा अधिकारी द्या:शिवसेना जिल्हाप्रमुख श्री .चंद्रकांत दादा जाधव.

पुसेसावळी दुरक्षेत्र परिसरात अवैध धंद्यांचा 'अंधार' आणि उपनिरीक्षकांची 'सुपरसोनिक' नेत्रे?

पुसेसावळी दुरक्षेत्र परिसरात अवैध धंद्यांचा 'अंधार' आणि उपनिरीक्षकांची 'सुपरसोनिक' नेत्रे?

विकासाचा महामेरू सकलजनांसी आधारू.माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर.व आमदार सचिन पाटील यांच्या पाठपुराव्याला यश

विकासाचा महामेरू सकलजनांसी आधारू.माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर.व आमदार सचिन पाटील यांच्या पाठपुराव्याला यश

फलटण शहरातील दैनंदिन पाणीपुरवठ्यासाठी नगराध्यक्ष समशेर सिंह नाईक निंबाळकर ॲक्शन मोडवर

फलटण शहरातील दैनंदिन पाणीपुरवठ्यासाठी नगराध्यक्ष समशेर सिंह नाईक निंबाळकर ॲक्शन मोडवर

ड्रॅगन सोल्जर स्पोर्ट्स अकॅडमी सातारा आयोजित 7वी आंतरशालेय स्पर्धा उत्साहात संपन्न

ड्रॅगन सोल्जर स्पोर्ट्स अकॅडमी सातारा आयोजित 7वी आंतरशालेय स्पर्धा उत्साहात संपन्न

अजिंक्यतारा किल्ल्यावर भीषण दुर्घटना;  २०० फूट खोल दरीत कोसळून कामगाराचा मृत्यू

अजिंक्यतारा किल्ल्यावर भीषण दुर्घटना; २०० फूट खोल दरीत कोसळून कामगाराचा मृत्यू

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला