पोलिसांना शिवीगाळ करणाऱ्या मद्यधुंद दुचाकीस्वाराची शिरवळ चौकात जाहीर धिंड

लोणंद : शहरात पोलिसांशी थेट शिवीगाळ व उर्मट वर्तन करण्याची ही पहिलीच घटना ठरली असून, या प्रकाराने संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे. मद्यधुंद अवस्थेत दुचाकी चालवत पोलिसांच्या शासकीय कर्तव्यात अडथळा आणणाऱ्या तरुणाविरोधात लोणंद पोलिसांनी अभूतपूर्व आणि कडक कारवाई करत, ज्या शिरवळ चौकात हा प्रकार घडला त्याच परिसरातून संशयिन आरोपीची जाहीर धिंड काढली. कायद्याला आव्हान देणाऱ्यांना कोणतीही माफी नाही, हा ठाम संदेश या कारवाईतून देण्यात आला आहे.

   याबाबत मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, वैभव अधिक माने (वय २५, रा. खेड, ता. खंडाळा) व त्याचा अल्पवयीन साथीदार हे युवक मद्यप्राशन करून  शिरवळ चौकात  दुचाकी चालवत होत त्याच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने वाहतूक नियंत्रणासाठी तैनात असणाऱ्या अतुल कुंभार या पोलिसांनी त्याला अडवून वाहन परवाना व कागदपत्रांची मागणी केली. मात्र, सहकार्य करण्याऐवजी संशयित आरोपीने पोलिसांशी अरेतुरेची भाषा वापरत घाणेरडी शिवीगाळ केली, हुज्जत घातली आणि जाणीवपूर्वक शासकीय कर्तव्यात अडथळा निर्माण केला. याप्रकरणी दोघांविरोधात लोणंद पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे

    लोणंद शहरात पोलिसांशी अशा प्रकारे उघडपणे शिवीगाळ करण्याची ही पहिलीच घटना असून या प्रकारामुळे काही काळ शिरवळ चौकात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून लोणंद पोलिसांनी तत्काळ संशयित आरोपींनला ताब्यात घेतले. प्राथमिक तपासात ते पूर्णपणे मद्यधुंद अवस्थेत असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर त्याच्यावर संबंधित कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.

 लोणंद पोलिसांनी ऐतिहासिक निर्णय घेत वैभव माने या संशयित आरोपीची जाहीर धिंड काढली. ज्या शिरवळ चौकात आरोपीने पोलिसांना शिवीगाळ करत उन्माद घातला, त्याच चौकातून व परिसरातील प्रमुख रस्त्यांवरून पोलिस बंदोबस्तात ही धिंड काढण्यात आली. रस्त्याच्या दुतर्फा मोठ्या संख्येने नागरिक जमा झाले होते. मद्यधुंद वाहनचालक व पोलिसांशी गैरवर्तन करणाऱ्यांचे काय होते, हे या कारवाईतून सर्वांसमोर मांडण्यात आले.

    नागरिकांनी या कडक कारवाईचे जोरदार स्वागत केले. लोणंदमध्ये आजपर्यंत पोलिसांशी असा प्रकार कधीच झाला नव्हता. पोलिसांनी योग्य वेळी कठोर पाऊल उचलले.अशी प्रतिक्रिया अनेक नागरिकांनी दिली. 

दरम्यान, लोणंद पोलिसांनी  धिंड काढून एक संदेशच दिला आहे की  पोलिसांशी शिवीगाळ, उर्मट वर्तन किंवा शासकीय कर्तव्यात अडथळा आणणाऱ्यांविरोधात यापुढेही अशाच कडक व जाहीर कारवाया करण्यात येतील

आम्हाला जोडण्यासाठी

स्थानिक बातम्या

फलटण पंचायत समिती सभापती निवडणुकी साठी  निवडणूक निर्णय अधिकारी सौ. प्रियांका आंबेकर( प्रांत ) तथा उपविभागीय अधिकारी फलटण यांचे ऐवजी दुसरा अधिकारी द्या:शिवसेना जिल्हाप्रमुख श्री .चंद्रकांत दादा जाधव.

फलटण पंचायत समिती सभापती निवडणुकी साठी निवडणूक निर्णय अधिकारी सौ. प्रियांका आंबेकर( प्रांत ) तथा उपविभागीय अधिकारी फलटण यांचे ऐवजी दुसरा अधिकारी द्या:शिवसेना जिल्हाप्रमुख श्री .चंद्रकांत दादा जाधव.

पुसेसावळी दुरक्षेत्र परिसरात अवैध धंद्यांचा 'अंधार' आणि उपनिरीक्षकांची 'सुपरसोनिक' नेत्रे?

पुसेसावळी दुरक्षेत्र परिसरात अवैध धंद्यांचा 'अंधार' आणि उपनिरीक्षकांची 'सुपरसोनिक' नेत्रे?

विकासाचा महामेरू सकलजनांसी आधारू.माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर.व आमदार सचिन पाटील यांच्या पाठपुराव्याला यश

विकासाचा महामेरू सकलजनांसी आधारू.माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर.व आमदार सचिन पाटील यांच्या पाठपुराव्याला यश

फलटण शहरातील दैनंदिन पाणीपुरवठ्यासाठी नगराध्यक्ष समशेर सिंह नाईक निंबाळकर ॲक्शन मोडवर

फलटण शहरातील दैनंदिन पाणीपुरवठ्यासाठी नगराध्यक्ष समशेर सिंह नाईक निंबाळकर ॲक्शन मोडवर

ड्रॅगन सोल्जर स्पोर्ट्स अकॅडमी सातारा आयोजित 7वी आंतरशालेय स्पर्धा उत्साहात संपन्न

ड्रॅगन सोल्जर स्पोर्ट्स अकॅडमी सातारा आयोजित 7वी आंतरशालेय स्पर्धा उत्साहात संपन्न

अजिंक्यतारा किल्ल्यावर भीषण दुर्घटना;  २०० फूट खोल दरीत कोसळून कामगाराचा मृत्यू

अजिंक्यतारा किल्ल्यावर भीषण दुर्घटना; २०० फूट खोल दरीत कोसळून कामगाराचा मृत्यू

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला