अनाथ बालकांच्या पालकांनी संपर्क साधण्याचे आवाहन

सातारा : जिल्ह्यात विविध ठिकाणहून मिळून आलेल्या मुलांच्या पालकांचा बालकल्याण समिती, सातारा जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी सातारा जिल्हा बाल संरक्षण कक्ष सातारा या कार्यालयाकडून शोध सुरू असून मुलांच्या पालकांनी सदर कार्यालयाशी 30 दिवसाच्या आत संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी व्ही. ए. तावरे यांनी केले आहे.

दरम्यान, बालकल्याण समिती सातारा यांचेकडून जाहीर निवेदनात नमूद करण्यात आले की, सदर फोटोतील पाच बालके ही बालकल्याण समिती सातारा मार्फत जिल्हा परीविक्षा अनु. संघ संच मुला-मुलींचे निरीक्षण गृह बालगृह सातारा येथे दाखल आहेत. तरी या बालकांच्या पालकांचा शोध घेऊन बालकांना पालक किंवा नातेवाईकांचे सुपूर्त करण्यात येणार आहे. त्यासाठी बालकांच्या पालक व नातेवाईकांनी शोध बाल कल्याण समिती सातारा, जिल्हा महिला व बालकल्याण अधिकारी सातारा जिल्हा बाल संरक्षण कक्ष सातारा या कार्यालयाकडून शोध सुरू असून मुलांच्या पालकांनी सदर कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन या कार्यालयामार्फत करण्यात आले आहे.
सदर बालकांची नावे ही खालील प्रमाणे


सोमनाथ परशु वाघमारे (वय 10 वर्ष 05 महिने, पत्ता सोनेवाडी तालुका फलटण जिल्हा सातारा)

 कु . प्रिया सतीश कुमठेकर (वय 8 वर्ष 4 महिने, पत्ता मु. सावली पो. रोहाट तालुका जिल्हा सातारा)


 कु . पांगी विष्णू वाघमारे (वय 9 वर्ष 5 महिने, पत्ता सोनेवाडी तालुका फलटण जिल्हा सातारा)


अथर्व हिरेश पाटील (वय 13 वर्षे 11 महिने, पत्ता जिल्हा परिवीक्षा अनुरक्षण संघटना मुला मुलींचे निरीक्षणगृह /बालगृह सातारा)


कृष्णा रामसिंग चव्हाण (वय 10 वर्ष 10 महिने, पत्ता मौजे पुसेगाव तालुका खटाव जिल्हा सातारा)
या पाच मुले बालकल्याण समिती सातारा मार्फत जिल्हा परीविक्षा अनु. संघ संच मुला मुलींचे निरीक्षण गृह बालगृह सातारा येथे दाखल आहेत.तरी या मुलांच्या बाबत कोणाला काही माहिती असल्यास सातारा जिल्हा बाल संरक्षण कक्ष ९९२१३८०१३५ या नंबरची संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

आम्हाला जोडण्यासाठी
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त