फलटण येथील ज्येष्ठ पत्रकार राजाभाऊ बोंद्रे यांचे वडील बाबुराव बोंद्रे यांचे निधन

  • फलटण फलटण येथील ज्येष्ठ पत्रकार राजाभाऊ बाबुराव बोंद्रे यांचे वडील, बाबुराव शंकरराव बोंद्रे यांचे वयाच्या ८६ व्या वर्षी आकस्मित निधन झाले. ते वाठार निंबाळकर (ता. फलटण) येथील रहिवासी होते.
  •  17 ऑगस्ट रविवार रात्री साडेदहा वाजता सद् ग्रहस्थ बाबुराव शंकरराव बोंद्रे अण्णा यांचे प्रकृती खालावल्याने दुखद निधन झाले.  शंकरराव केदारी बोंद्रे हे मुले सतरा वर्षाचे असतानाच स्वर्गवासी झाल्याने त्यावेळच्या मॅट्रिक मधूनच शाळा सोडून वडिलांचा मुंबई येथील असणारा मुळजी जेठा मार्केट आणि इतर मार्केट मधला ट्रान्सपोर्टचा व्यवसाय सांभाळण्यास सुरुवात केली. 
  • त्यांच्या वडिलांच्या पाठीमागे त्यांनी त्यांच्या दोन बहिणीची आणि भावांची लग्न करून संसार सुरू केला कालांतराने मुंबईतील व्यवसाय बंद करून वाठारला स्थायीक होऊन त्यांची सर्व ही पाची मुलं उच्चशिक्षित करून सर्व मुलांना परदेशात पाठवून आपलं स्वप्न पूर्ण केलं. अण्णा हे अतिशय जिद्दी कष्टाळू आणि दूरदृष्टी असणारी होते काळानुसार सर्व गोष्टींचा विचार करून त्यांची अपुरी राहिलेली शिक्षणाची अपेक्षा त्यांनी त्याच्या मुलांच्या आणि नातवंडाच्या रूपाने पूर्ण केली.
  • त्यांना इंग्रजी गुजराती हिंदी आणि मराठी भाषा पूर्ण अवगत होत्या त्या चारही भाषेवर त्यांचे पूर्ण प्रभुत्व होतं. तसेच मोडी लिपी चे पण त्यांना पूर्ण ज्ञान होते मोडी लिपी ते सहज वाचत असत त्यांच्या वडिलांनी त्यांना मोडी लिपी शिकवली होती आपल्यापुढे शिक्षणाची त्यांनी त्यांच्या मुलांच्या आणि नातवंडांच्या उणीव भासू दिली नाही.
  • त्यांच्या पार्थिवावर, सोमवार दि. १८ ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजता वाठार निंबाळकर येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या निधनाने बोंद्रे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला