जावली तालुक्यातील जवानाचा गोळीबारात संशयास्पद मृत्यू
सैन्य तळावर झालेल्या गोळीबारात ४ जवानांचा मृत्यूSatara News Team
- Fri 14th Apr 2023 07:43 pm
- बातमी शेयर करा
सातारा : पंजाबच्या बठिंडा जिल्ह्यातील सैन्य तळावर १२ एप्रिल बुधवारी गोळीबाराचा प्रकार घडला यात दुर्दैवाने चार जवानांना प्राण गमवावे लागले यातच जावळी तालुक्यातील करंदोशी ता.जावळी येथील जवान तेजस मानकर याचा या गोळीबारात संशयास्पद मृत्यू झाला असल्याची माहिती समोर येत आहे. या घटनेने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.
सैन्य दलाचे अधिकारी मेजर भट्टाचार्य यांनी जावळी तालुक्याचे तहसीलदार राजेंद्र पोळ यांना केलेल्या मेलनुसार, जवान तेजस मानकर यांचे पार्थिव शनिवारी संध्याकाळी किंवा रविवारी दुपारपर्यंत गावी आणण्यात येणार असल्याचे त्यांच्या निकटवर्तीय यांनी सांगितले आहे.
सैन्य दलातील परस्परातील मतभेदामुळे गोळीबार झाल्याचा पंजाब पोलिसांचा व सैन्य दलातील पोलिसांचा संशय आहे. एका वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार संबंधित गोळीबार हा दहशतवादी घटना नसल्याचे स्थानिक पोलिसांनी स्पष्ट केले. सध्या या घटनेवर हेलिकॉप्टर आणि ड्रोन च्या मदतीने निगराणी केली जात आहे.
याप्रकरणी काही संशयीतांना देखील पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याचे सांगितले जात आहे. संबंधित सैन्य तळावर बाहेरून आलेल्या व्यक्तीने हा हल्ला केला असल्याचे बोलले जात आहे. परस्परांमधील मतभेदामुळे जवान मरण पावले असल्याचे काही वृत्तामध्ये प्रसिद्ध झाले आहे. याप्रकरणी काही संशयीतांना पोलिसांनी ताब्यात देखील घेतली आहे. याबाबत अतिरिक्त पोलीस महानिर्देशक एडीजी सुरेंद्र पाल सिंह परमार यांनी कोणताही अतिरेकी हमला नसल्याचा दुजोरा दिला आहे.
स्थानिक बातम्या
राजीनाम्याचा लेटर बॉम्ब; साताऱ्यात शिंदे शिवसेनेत खळबळ
- Fri 14th Apr 2023 07:43 pm
अक्षय तृतीया विशेष : क्रांतिसूर्य महात्मा बसवेश्वर
- Fri 14th Apr 2023 07:43 pm
पुसेसावळी दुरक्षेत्र परिसरात अवैध धंद्यांचा 'अंधार' आणि उपनिरीक्षकांची 'सुपरसोनिक' नेत्रे?
- Fri 14th Apr 2023 07:43 pm
फलटण शहरातील दैनंदिन पाणीपुरवठ्यासाठी नगराध्यक्ष समशेर सिंह नाईक निंबाळकर ॲक्शन मोडवर
- Fri 14th Apr 2023 07:43 pm
संबंधित बातम्या
-
सुट्टीतही पटपडताळणी, चहा-पाणीची चर्चा; महाबळेश्वर तालुक्यात शिक्षण विभागावर प्रश्नचिन्ह
- Fri 14th Apr 2023 07:43 pm
-
खटावच्या विद्यमान तहसिलदारांनी खटावच्या जनतेला दुसऱ्यांदा स्वातंत्र्य मिळवून दिले?
- Fri 14th Apr 2023 07:43 pm
-
जिल्हा परिषदेच्या इमारतीत चक्क दुरुस्तीची कामे
- Fri 14th Apr 2023 07:43 pm
-
पुसेसावळी येथे लागोपाठ चोऱ्यांचे सत्र सुरूच, पोलिस प्रशासन मात्र हतबल!
- Fri 14th Apr 2023 07:43 pm
-
सहा.पो.नि. अक्षय सोनवणे यांचा सराईत गुन्हेगारांना दणका
- Fri 14th Apr 2023 07:43 pm
-
पुसेसावळीतील सावकारी च्या 'उदय' मुळे कळंबीतील एक कुटुंब 'अस्त' होण्याच्या मार्गावर...
- Fri 14th Apr 2023 07:43 pm
-
फलटण शहरचे पोलीस निरीक्षक हेमंतकुमार शहा यांची तडकाफडकी बदली
- Fri 14th Apr 2023 07:43 pm
-
वडूज येथील रास्तभाव दुकानाबाबत दोष आढळल्याने नोटीस.
- Fri 14th Apr 2023 07:43 pm













