बेकायदेशीर शस्त्र बाळगणाऱ्या एकास अटक; 1 कोयता, 2 सुऱ्यांसह 29 हजाराचा मुद्देमाल जप्त
जुबेर शेख - Sat 5th Aug 2023 05:10 pm
- बातमी शेयर करा
सातारा : सातारा शहरामध्ये धारदार शस्त्रे विक्री, बाळगणे व वाहतुक करणाऱ्या इसमांवर कारवाई कारवाई करण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक समीर शेख व अपर पोलीस अधीक्षक बापु बांगर यांनी दिल्यानंतर शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेकडून आज धडक कारवाई करण्यात आली. यावेळी खुल्लेआमपणे कोयता व सुरा नाचवणाऱ्या एकास अटक करण्यात आली. तसेच त्याच्याकडून 1 कोयता, 2 सुरे यश मोबाईल आणि दुचाकी असा 29 हजाराचा मुद्देमाल जप्त केला.
विक्रम अशोक सांळुखे (वय 24 वर्षे रा. नेले ता. जि. सातारा) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, पोलीस अधीक्षक समीर शेख, उपविभागीय पोलीस अधिकारी किरणकुमार सुर्यवंशी यांनी शहरात बेकायदा शस्त्रे बाळगणाऱ्यांवर कारवाई करावी अशा सूचना पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे यांना दिलेल्या होत्या. त्याप्रमाणे पोलीस निरीक्षक फडतरे यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकास अवैध धारदार शस्त्रे विक्री, बाळगणे व वाहतुक करणारे इसमांची माहिती काढुन त्यांच्यावर कारवाई करणेबाबत मार्गदर्शन करुन सुचना दिल्या.
दि. 4 ऑगस्ट रोजी पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे यांना एक लालरंगाचा टि शर्ट घातलेला इसम काळे रंगाच्या दुचाकीवरून पांढरे रंगाचे पोत्यामध्ये धारदार शस्त्र घेऊन दत्तकृपा मोटर गॅरेजचे समोर मोळाचा ओढा येथे येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर फडतरे यांनी तात्काळ याची माहिती पथकास दिली. व पथकासह संबंधित ठिकाणी सापळा रचला. त्यानंतर ठरल्याप्रमाणे वेळेला संबंधित इसम दुचाकीवरून येत असताना त्यांना दिसला. तसेच त्याची विचारपूस केल्यानंतर त्याला ताब्यात घेतले. त्याची तपासणी केली असता त्याच्या जवळ पांढरे रंगाच्या पोत्यात एक कोयता व दोन सुरे आढळून आले. त्यानंतर संबंधित इसमास इसमास ताब्यात घेत शाहुपुरी पोलीस ठाण्यात आणण्यात आले. व त्याच्यावर आर्म अॅक्ट प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला.
अशा प्रकारे शाहुपुरी गुन्हेप्रकटीकरण शाखेने बेकायदेशीर शस्त्र बळगणा-या इसमा कडुन 1 कोयता, 2 सुरे, मोबाईल व मोटारसायकल असा 29 हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करून त्याचे विरूद्ध शाहुपुरी पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद केलेला आहे. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक बापु बांगर, उपविभागीय पोलीस अधिकारी किरणकुमार सुर्यवंशी, पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे, यांचेमार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोउपनि श्री कृष्णा गुरव, पोहवा-सुरेश घोडके, पोना- मनोज मदने, निलेश काटकर, महेश बनकर, अभय साबळे, जोतिराम पवार, पोका- सचिन पवार,स्वप्निल सावंत, स्वप्निल पवार, सुमित मोरे, सुनिल भोसले यांनी केली आहे.
स्थानिक बातम्या
फलटण तालुक्यात शिवसेना एकनाथ शिंदे गट आता होणार प्रबळ दावेदार.
- Sat 5th Aug 2023 05:10 pm
फलटण पंचायत समिती सदस्य पदासाठी सांगवी गणातून सौ .सारिका संजय सोडमिसे प्रबळ दावेदार.
- Sat 5th Aug 2023 05:10 pm
शिक्षण प्रसारक संस्थेचा पूरग्रस्त विद्यार्थ्यांना मदतीचा हात..
- Sat 5th Aug 2023 05:10 pm
फलटण शहरचे पोलीस निरीक्षक हेमंतकुमार शहा यांची तडकाफडकी बदली
- Sat 5th Aug 2023 05:10 pm
उपमुख्यमंत्री अजित पवार आणि धिरेंद्रराजे खर्डेकर यांची राजकीय भेट
- Sat 5th Aug 2023 05:10 pm
संबंधित बातम्या
-
युवतीला लग्नाचे अमिष दाखवून बलात्कार; करंजे येथील युवकावर गुन्हा दाखल
- Sat 5th Aug 2023 05:10 pm
-
ग्रामविकासमंत्र्यांच्या मतदारसंघात अवैध धंद्यांचा 'ग्रामीण विकास'
- Sat 5th Aug 2023 05:10 pm
-
चोरीला गेलेले व गहाळ झालेले २० मोबाईल व ०१ टॅब यांचा शोध घेऊन तक्रारदार यांना वाई पोलिसानी केले परत
- Sat 5th Aug 2023 05:10 pm
-
घरगुती वादातून दिराने केला वहिनीचा विनयभंग !
- Sat 5th Aug 2023 05:10 pm
-
औंध पोलीस ठाण्यातील सायबर आणि क्राईम विभागाची उल्लेखनीय कामगिरी.
- Sat 5th Aug 2023 05:10 pm
-
फलटणमध्ये पोलिसांसमोरच हवेत गोळीबार; एकजण ताब्यात, एक फरार
- Sat 5th Aug 2023 05:10 pm
-
वृद्धेच्या डोक्यात दगड घालून खून केल्याप्रकरणी आरोपीस जन्मठेप.
- Sat 5th Aug 2023 05:10 pm
-
गुरु द्रोणा अकॅडमी फलटण येथे विद्यार्थ्यास मारहाण.
- Sat 5th Aug 2023 05:10 pm













