देशातील 75 बँकांच्या डिजिटल बँकींग कार्यप्रणालीचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण
सातारा येथील बँक ऑफ महाराष्ट्रचाही समावेशSatara News Team
- Mon 17th Oct 2022 04:48 am
- बातमी शेयर करा
सातारा : स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त देशातील 75 डिजिटल बँकींग युनिटची स्थापना करण्यात आली असून यामध्ये सातारा येथील बँक ऑफ महाराष्ट्रचाही समावेश आहे. डिजीटल कार्यप्रणालीचे लोकार्पण दूरदृष्य प्रणालीद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले.
यावेळी दूरदृष्य प्रणालीद्वारे केंद्रीय अर्थ मंत्री निर्मला सितारामण उपस्थित होत्या. तर पायोनिर टॉवर, सातारा येथून खासदार धनंजय महाडीक, आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार जयकुमार गोरे, जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, बँक ऑफ महाराष्ट्रचे व्यवस्थापकीय संचालक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी ए.एस. राजीव, अंचल प्रबंधक विवेक नाचणे, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक युवराज पाटील यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
डिजीटल बँकेतील अधिकारी हे ग्राहकांना डिजिटल व्यवहार कसे करावे याबाबत मार्गदर्शन करणार आहेत. यामध्ये ग्राहकांना अनेक सुविधा देण्यात येणार आहेत. तसेच वित्तीय साक्षरता, डिजीटल व्यवहार, ऑनलाईन फसवणूक होणार नाही याचेही ग्राहकांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. तसेच ग्राहकांच्या शंकांचेही निरासण करण्यात येणार आहे.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त 75 जिल्हृयातील 75 डिजिटल बँक करण्यात आल्या आहेत. यामध्ये महाराष्ट्रातील नागपूर, औरंगाबाद तसेच सातारा येथील बॅक ऑफ महाराष्ट्रचा समावेश आहे. या डिजिटील बँकींगमुळे आर्थिक सक्षमीकरणाला चालना, डिजिटल बँकीग साक्षरता होण्यास मदत होणार असल्याचा विश्वास उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला.
0000
स्थानिक बातम्या
राजीनाम्याचा लेटर बॉम्ब; साताऱ्यात शिंदे शिवसेनेत खळबळ
- Mon 17th Oct 2022 04:48 am
अक्षय तृतीया विशेष : क्रांतिसूर्य महात्मा बसवेश्वर
- Mon 17th Oct 2022 04:48 am
पुसेसावळी दुरक्षेत्र परिसरात अवैध धंद्यांचा 'अंधार' आणि उपनिरीक्षकांची 'सुपरसोनिक' नेत्रे?
- Mon 17th Oct 2022 04:48 am
फलटण शहरातील दैनंदिन पाणीपुरवठ्यासाठी नगराध्यक्ष समशेर सिंह नाईक निंबाळकर ॲक्शन मोडवर
- Mon 17th Oct 2022 04:48 am
संबंधित बातम्या
-
सुट्टीतही पटपडताळणी, चहा-पाणीची चर्चा; महाबळेश्वर तालुक्यात शिक्षण विभागावर प्रश्नचिन्ह
- Mon 17th Oct 2022 04:48 am
-
खटावच्या विद्यमान तहसिलदारांनी खटावच्या जनतेला दुसऱ्यांदा स्वातंत्र्य मिळवून दिले?
- Mon 17th Oct 2022 04:48 am
-
जिल्हा परिषदेच्या इमारतीत चक्क दुरुस्तीची कामे
- Mon 17th Oct 2022 04:48 am
-
पुसेसावळी येथे लागोपाठ चोऱ्यांचे सत्र सुरूच, पोलिस प्रशासन मात्र हतबल!
- Mon 17th Oct 2022 04:48 am
-
सहा.पो.नि. अक्षय सोनवणे यांचा सराईत गुन्हेगारांना दणका
- Mon 17th Oct 2022 04:48 am
-
पुसेसावळीतील सावकारी च्या 'उदय' मुळे कळंबीतील एक कुटुंब 'अस्त' होण्याच्या मार्गावर...
- Mon 17th Oct 2022 04:48 am
-
फलटण शहरचे पोलीस निरीक्षक हेमंतकुमार शहा यांची तडकाफडकी बदली
- Mon 17th Oct 2022 04:48 am
-
वडूज येथील रास्तभाव दुकानाबाबत दोष आढळल्याने नोटीस.
- Mon 17th Oct 2022 04:48 am













