मिचेल स्टार्कचा २४.७५ कोटीचा 'स्पार्क' ! ७२ खेळाडूंवर २३०.४५ कोटींचा वर्षाव, जाणून घ्या कोणी कोणाला खरेदी केले

दुबई : आयपीएलच्या इतिहासातील सर्वाधिक बोली यावेळी लागल्याचे पाहायला मिळाले. IPL 2024 Auction मध्ये यापूर्वी ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सला २० कोटी आणि ५० लाख रुपयांची सर्वाधिक बोली लागल्याचे पाहायला मिळाले होते. त्यावेळी कमिन्स हा आयपीएलमधील सर्वात महागडा खेळाडू असेल असे वाटत होते. पण त्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या अजून एका खेळाडूने लिलावात सर्वात मोठी झेप घेतली आणि आता आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू तो ठरला आहे.

गेल्या लिलावात इंग्लंडचा सॅम करन हा सर्वात महागडा खेळाडू होता, त्याला १८.५० कोटी रुपये मिळाले होते. पण या लिलावात सर्वात महागडा खेळाडू पहिल्यांदा पॅट कमिन्स ठरला होता. पण त्यानंतरही काही वेळाने आयपीएलमधील सर्वात महागडा खेळाडू पाहायला मिळाला. सुरुवातीला मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स या दोन्ही संघांनी ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कसाठी बोली लावायाल सुरुवात केली. या दोघांमध्ये चांगलीच चुरस पाहायला मिळत होती. त्यामुळे आता दिल्ली बाजी मारणार की मुंबई, हे समजत नव्हते. पण त्यानंतर काही वेळात दिल्लीच्या संघाने माघार घेतली. त्यामुळे हा स्टार्क मुंबईच्या संघात सामील होणार, असे दिसत होते. पण त्यानंतर या लिलावात अनपेक्षितपणे उडी घेतली ती केकेआर आणि गुजरात टायटन्स या दोन्ही संघांनी. त्यामुळे काही वेळानंतर मुंबईचा संघ या बोलीमधून बाहेर पडला. त्यानंतर केकेआर आणि गुजरात यांच्यात चांगलीच चुरस पाहायला मिळाली. ही बोली २० कोटी रुपयांपेक्षा जास्त झाली. पण तरीही हे दोन्ही संघ काही थांबत नव्हते. पण अखेर गुजरातच्या संघाने माघार घेतली आणि स्टार्क हा आयपीएलमधील सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. कारण स्टार्कला कोलकाता नाइट रायडर्सच्या संघाने तब्बल २४.७५ कोटी रुपये मोजत आपल्या संघात दाखल केले. त्यामुळे आता केकेआरच्या संघात एक मॅचविनर खेळाडू दाखल झाला आहे.

IPL 2024 Auction मधील महागडे खेळाडू

* मिचेल स्टार्क ( कोलकाता नाइट रायडर्स ) - २४.७५ कोटी


पॅट कमिन्स ( सनरायझर्स हैदराबाद ) - २०.५० कोटी


डॅरिल मिचेल ( चेन्नई सुपर किंग्स ) - १४ कोटी


हर्षल पटेल ( पंजाब किंग्स ) - ११.७५ कोटी


अल्झारी जोसेफ ( रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ) - ११.५० कोटी


समीर रिझवी  ( चेन्नई सुपर किंग्स) - ८.४० कोटी


रायली रूसो ( पंजाब किंग्स ) - ८ कोटी


शाहरुख खान ( गुजरात टायटन्स) - ७.४० कोटी


रोव्हमन पॉवेल ( राजस्थान रॉयल्स) - ७.४० कोटी


कुमार कुशाग्र ( दिल्ली कॅपिटल्स) - ७.२० कोटी


ट्रॅव्हिस हेड ( सनरायझर्स हैदराबाद ) - ६.८० कोटी

 

कोणत्या संघाने आज कोणाला ताफ्यात घेतले?

 

चेन्नई सुपर किंग्स - डॅरिल मिचेल ( १४ कोटी), समीर रिझवी ( ८.४० कोटी), शार्दूल ठाकूर ( ४ कोटी), मुस्ताफिजूर रहमान ( २ कोटी), रचिन रविंद्र ( १.८० कोटी), अवनिश राव आरावेल्ली ( २० लाख) 

दिल्ली कॅपिटल्स - कुमार कुशाग्रा ( ७.२० कोटी), झाय रिचर्डसन ( ५ कोटी), हॅरी ब्रुक ( ४ कोटी), सुमीत कुमार ( १ कोटी), त्रिस्तान स्टुब्स ( ५० लाख), रसिख दार ( २० लाख), रिकी भुई ( २० लाख), स्वास्तिक चिकारा ( २० लाख).

गुजरात टायटन्स - स्पेन्सर जॉन्सन ( १० कोटी), शाहरुख खान ( ७.४० कोटी), उमेश यादव ( ५.८० कोटी), रॉबिन मिंझ ( ३.६० कोटी), सुशांत मिश्रा ( २.२० कोटी), आझमतुल्लाह ओमारझाई ( ५० लाख), मानव सुतार ( २० लाख), कार्तिक त्यागी ( ६० लाख) 

कोलकाता नाइट रायडर्स - मिचेल स्टार्क ( २४.७५ कोटी), मुजीब रहमान ( २ कोटी), शेर्फाने रुथरफोर्ड ( १.५० कोटी), गस एटकिसन ( १ कोटी), मनिष पांडे ( ५० लाख), केएस भरत ( ५० लाख), चेतन सकारिया ( ५० लाख), अंगरिष रघुवंशी ( २० लाख), रमनदीप सिंग ( २० लाख), साकिब हुसैन ( २० लाख)

लखनौ सुपर जायंट्स - शिवम मावी ( ६.४० कोटी), एम सिद्धार्थ ( २.४० कोटी), डेव्हिड विली ( २ कोटी), एश्टन टर्नर ( १ कोटी), अर्शीन कुलकर्णी ( २० लाख), मोहम्मद अर्शद खान ( २० लाख)

 मुंबई इंडियन्स - गेराल्ड कोएत्झी ( ५ कोटी), नुवान तुषारा ( ४.८० कोटी), दिलशान मदुशंका ( ४.६० कोटी), मोहम्मद नबी ( १.५० कोटी), श्रेयस गोपाल ( २० लाख), शिवालिक शर्मा ( २० लाख), अंशुल कम्बोज ( २० लाख), नमन धीर ( २० लाख)

पंजाब किंग्स - हर्षल पटेल ( ११.७५ कोटी), रिली रोसू ( ८ कोटी), ख्रिस वोस्क ( ४.२० कोटी), तमन त्यागराजन ( २० लाख), विश्वनाथ प्रताप सिंग ( २० लाख), आशुतोष शर्मा ( २० लाख), शशांक सिंग ( २० लाख), प्रिन्स चौधरी ( २० लाख)

राजस्थान रॉयल्स - रोव्हमन पॉवेल ( ७.४० कोटी), शुभम दुबे ( ५.८० कोटी), नांद्रे बर्गर ( ५० लाख), टॉम कोह्लेर-कॅडमोर ( ४० लाख), आबिद मुश्ताक ( २० लाख)

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू - अल्झारी जोसेफ ( ११.५० कोटी), यश दयाल ( ५ कोटी), ल्युकी फर्ग्युसन ( २ कोटी), टॉम कुरन ( १.५० कोटी), सौरव चौहान ( २० लाख), स्वप्निल सिंग ( २० लाख)

सनरायझर्स हैदराबाद - पॅट कमिन्स ( २०.५० कोटी), ट्रॅव्हिस हेड ( ६.८० कोटी), जयदेव उनाडकट ( १.६० कोटी), वनिंदू हसरंगा ( १.५० कोटी), झाथवेध सुब्रमन्यम ( २० लाख), आकाश सिंग ( २० लाख)

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला