पेट्री येथील राज कास हिल रिसोर्ट वर पोलिसांचा छापा.. रिसोर्ट मधील हॉलमध्ये बारबालांसोबत डान्स...18 जणांवर गुन्हा दाखल
Satara News Team
- Sat 28th Oct 2023 10:37 pm
- बातमी शेयर करा
सातारा : दि.28/10/2023 रोजी रात्री उशीरा पेट्री ता. जि. सातारा येथील राज कास हिल रिसोर्ट नावचे हॉटेलमधील हॉलमध्ये काही तरुणांनी 6 महिलां आणुन त्यांना बारवाला या संगिताचे तालावर उत्तान कपडयात विभत्स हावभाव करुन अंगविक्षेप करुन नृत्य करीत असलेची माहिती प्राप्त झाली. मा. पोलीस अधिक्षक, सातारा यांनी सदर माहितीच्या अनुषंगाने सदर ठिकाणी जावुन छापा टाकुन कारवाई करण्याचे आदेश पोलीस निरीक्षक श्री विश्वजित घोडके यांना दिलेने पोलीस निरीक्षक विश्वजितं घोडके यांनी मा.उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. किरणकुमार सुर्यवंशी यांचे उपस्थित सातारा तालुका पोलीस ठाणे, सातारा शहर पोलीस ठाणेकडील स्टाफसह राज कास हिल रिसोर्टमध्ये दिनांक 28/10/2023 रोजी 01.00 वा.चे सुमारास छापा टाकला असता सदर रिसोर्टमधील हॉलमध्ये 6 बारवाला हॉलमध्ये असलेल्या एकुण 18 पुरुषांचे समोर आळी पाळीने येवुन उत्तान कपडयात गि-हाईकांच्या समोर उभ्या राहुन बिभत्स हावभाव करुन गि-हाईकांचे जवळ जाऊन त्यांचेशी लगट करीत होत्या सदर बारवालांच्या कृत्यावर गि-हाईक इसम हे आनंद घेऊन नमुद बारबालांवर भारतीय चलनातील नोटा उडवित होते त्यावेळी राज कास हिल रिसोर्टचे मालक, मॅनेजर व वेटर्स हे पोलीसांची चाहुल लागताच सदर ठिकाणावरुन पळुन गेले असुन हॉलमध्ये नारवारला महिलांसोबत डान्स करीत असलेल्या इसमांना पोलीसांनी जागीच ताब्यात घेतलेआहे
सदर एकुण 18 इसमांचे ताब्यामध्ये एकुण 82.698 /- रुपये रक्कमचा माल त्यामध्ये रोख रक्कम व मोबाईल हॅण्डसेट जप्त केलेले आहेत. तसेच हॉल मधील जीबीएस कंपनीचा साऊंण्ड सिस्टीम व डिस्को लाईट देखील जप्त करण्यात आली आहे. सदर बाबत राज कास हिल रिसोर्टचे मालक, मॅनेजर, वेटर्स व 18 गि-हाईकांवर सातारा तालुका पोलीस ठाणेस गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर गुन्हयाचा अधिक तपास मा. वरीष्ठांचे सुचनांप्रमाणे पोलीस उपनिरीक्षक श्री दळवी हे करीत आहेत. सदरची कारवाई ही मा. श्री. समीर शेख साो, पोलीस अधीक्षक सातारा, मा.आँचल दलाल मॅडम अपर पोलीस अधीक्षक सातारा यांचे मार्गदर्शनानुसार तसेच मा. श्री. किरणकुमार सुर्यवंशी उपविभागिय पोलीस अधिकारी सातारा शहर विभाग, सातारा यांचे उपस्थितीत श्री. विश्वजित घोडके पोलीस निरीक्षक, सातारा तालुका, श्री. डी. ए. दळवी, पोलीस उप निरीक्षक, म.पो.उप निरीक्षक पाटील मॅडम सातारा शहर पो.स्टे. तसेच सातारा तालुका पोलीस ठाणेकडील पो.हवा. मालोजी चव्हाण, सचिन पिसाळ,
पो.ना. किरण जगताप, पो. कॉ. शंकर पाचांगणे, सातारा शहर पोलीस ठाणेकडील पो.हवा. निलेश यादव, पो. हवा. महांगडे, पो.कॉ. महांगडे यांनी सदर कारवाई केलेली आहे. सदर कारवाईचे अनुषंगाने मा. पोलीस अधिक्षक सो सातारा यांनी पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांचे अभिनंदन केले आहे.
स्थानिक बातम्या
सातारा जिल्हा (पंचायत समिती) एकूण 130 गण फायनल आकडेवारी
- Sat 28th Oct 2023 10:37 pm
संपूर्ण सातारा जिल्हा परिषद 65 गटा मध्ये फायनल अपडेट
- Sat 28th Oct 2023 10:37 pm
पुसेसावळी जिल्हा परिषद गटातील विकासकामांच्या माहिती फलकांचा अभाव : पारदर्शकतेला धक्का, नागरिकांमध्ये असंतोष.
- Sat 28th Oct 2023 10:37 pm
जिल्हा परिषदेच्या इमारतीत चक्क दुरुस्तीची कामे
- Sat 28th Oct 2023 10:37 pm
गव्हाच्या पिकात नशिल्या शेतीचा पर्दाफाश पाली गावात तब्बल 51 किलो असा गांजा जप्त
- Sat 28th Oct 2023 10:37 pm
आ.सदाभाऊ खोत यांच्या उपस्थितीत शिवथरमध्ये विकासकामांचे भूमिपूजन
- Sat 28th Oct 2023 10:37 pm
संबंधित बातम्या
-
पोलिसांना शिवीगाळ करणाऱ्या मद्यधुंद दुचाकीस्वाराची शिरवळ चौकात जाहीर धिंड
- Sat 28th Oct 2023 10:37 pm
-
गव्हाच्या पिकात नशिल्या शेतीचा पर्दाफाश पाली गावात तब्बल 51 किलो असा गांजा जप्त
- Sat 28th Oct 2023 10:37 pm
-
औंध पोलिस ठाण्याचे हद्दीतील अवैध धंद्याबाबत पोलिस पाटलांची कामगिरी संशयास्पद.
- Sat 28th Oct 2023 10:37 pm
-
औंधमध्ये गुपचूप वाढणारे अवैध धंदे — प्रशासन आणि प्रस्थापितांचा मौन का?
- Sat 28th Oct 2023 10:37 pm
-
सातारा नगरपालिका निवडणुक : ५१ सराईत गुन्हेगार हद्दपार
- Sat 28th Oct 2023 10:37 pm
-
राजाचे कुर्ल्यातील युवकास आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या सावकारावर गुन्हा दाखल.
- Sat 28th Oct 2023 10:37 pm
-
वडुज पोलीस ठाणे हद्दीतुन नागरिकांचे गहाळ झालेले सुमारे साडेचार लाख रुपये किंमतीचे एकुण २४ मोबाईल हस्तगत
- Sat 28th Oct 2023 10:37 pm
-
निवृत्त शिक्षकाच्या प्रकरणात साताऱ्यात वरिष्ठ सहाय्यक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात
- Sat 28th Oct 2023 10:37 pm












