मोपेड दुचाकी चोरणारा चोरटा जेरबंद ३५ हजार रुपये किमतीची दुचाकी हस्तगत
ओमकार सोनावले- Mon 8th Aug 2022 09:02 am
- बातमी शेयर करा
सातारा : मोपेड दुचाकी चोरट्याला निर्बंध करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले. प्रशांत सर्जेराव किर्तीकुडाव, रा. बौद्धवस्ती, कोडोली, ता. सातारा असे त्याचे नाव आहे. त्याच्याकडून ३५ हजार रुपये किमतीची दुचाकी हस्तगत करण्यात आली आहे.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि.१५ जुन २०२२ रोजी मोळाचा ओढा येथून अज्ञात चोरट्याने मोपेड दुचाकी चोरून नेल्याची तक्रार शाहूपुरी पोलीस ठाण्यात दाखल झाली होती. हा चोरीचा गुन्हा उघडकीस आणण्याच्या सूचना वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांना दिल्या होत्या. गुन्ह्याचा तपास सुरू असताना या गुन्ह्यातील संशयित कोडोली, ता. सातारा येथे येणार असल्याची माहिती किशोर धुमाळ यांना मिळाली. त्यांनी तात्काळ संबंधित इसमाला जेरबंद करण्याच्या सूचना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला केल्या. पोलिसांनी कोडोली येथे सापळा रचला असता संबंधित इसम चोरलेल्या मोपेड दुचाकीसह आढळून आला. पथकाने त्याला ताब्यात घेऊन त्याच्याकडे चौकशी केली असता . प्रशांत सर्जेराव किर्तीकुडाव याने ही दुचाकी आपण मोळाचा ओढा येथून चोरी केली असल्याची कबुली दिली. त्याच्याकडून ३५ हजार रुपये किमतीची दुचाकी हस्तगत करण्यात आली आहे. या कारवाईत पोलीस हवालदार राजकुमार ननावरे, प्रवीण फडतरे, शिवाजी भिसे, स्वप्नील माने, अमित सपकाळ, विक्रम पिसाळ, केतन शिंदे, स्वप्निल दौंड यांनी सहभाग घेतला.
स्थानिक बातम्या
राजीनाम्याचा लेटर बॉम्ब; साताऱ्यात शिंदे शिवसेनेत खळबळ
- Mon 8th Aug 2022 09:02 am
अक्षय तृतीया विशेष : क्रांतिसूर्य महात्मा बसवेश्वर
- Mon 8th Aug 2022 09:02 am
पुसेसावळी दुरक्षेत्र परिसरात अवैध धंद्यांचा 'अंधार' आणि उपनिरीक्षकांची 'सुपरसोनिक' नेत्रे?
- Mon 8th Aug 2022 09:02 am
फलटण शहरातील दैनंदिन पाणीपुरवठ्यासाठी नगराध्यक्ष समशेर सिंह नाईक निंबाळकर ॲक्शन मोडवर
- Mon 8th Aug 2022 09:02 am
संबंधित बातम्या
-
वाठार (निंबाळकर) येथील रवींद्र खोपडे यांचा खाजगी सावकारांच्या त्रासाने संसार उध्वस्त.
- Mon 8th Aug 2022 09:02 am
-
शिक्षकाने केला विद्यार्थिनीला अश्लील मेसेज
- Mon 8th Aug 2022 09:02 am
-
पुसेसावळी दुरक्षेत्र परिसरात अवैध धंद्यांचा 'अंधार' आणि उपनिरीक्षकांची 'सुपरसोनिक' नेत्रे?
- Mon 8th Aug 2022 09:02 am
-
पोक्सो तील आरोपीस २० वर्ष सश्रम कारावास व रु ५००००/- दंडाची शिक्षा.
- Mon 8th Aug 2022 09:02 am
-
उंब्रजमध्ये दिवसाढवळ्या चोरी
- Mon 8th Aug 2022 09:02 am
-
कराड आगाशिवनगर येथे प्रेम संबंधातून खून
- Mon 8th Aug 2022 09:02 am
-
फलटण येथील सराईत गुन्हेगारांवर पोलिसांची मोठी कारवाई; दोन जणांना दोन वर्षांसाठी जिल्हाबंदी
- Mon 8th Aug 2022 09:02 am












