पोवई नाक्यावरील राड्याप्रकरणी दोन गुन्हे दाखल
Satara News Team
- Sat 6th Apr 2024 12:15 pm
- बातमी शेयर करा
सातारा : पोवई नाका येथे गुरुवारी सांयकाळी झालेला राडा जुन्या वादातून झाला असल्याचे समोर आले असून याप्रकरणी एकूण दोन गुन्हे दाखल झाले आहेत. जबरी चोरीसह पोलिसांच्यावतीनेही याप्रकरणी एक तक्रार देण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पहिली तक्रार ऋषभ राजेंद्र जाधव, योगेश देवकर, राजेंद्र जाधव, बंटी माने, ऋषीकेश पांचागणे अनोळखी दोन यांच्या विरुध्द अक्षय सुनील मांढरे (वय 27, रा. चिमणपुरा पेठ, सातारा) यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. तक्रारदार ऋषभ हे मित्रासोबत बोलत पोवई नाका येथे थांबले असताना संशयित टोळक्याने त्यांच्यावर जुन्या वादातून लाथा-बुक्क्यांनी व दगडाने मारहाण करत जखमी केले. तसेच यावेळी संशयित टोळक्याने त्यांच्या खिशातील 25 हजार रुपये व तीन तोळ्याची सोन्याची चेन जबरदस्तीने चोरुन नेली असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
दुसरी तक्रार अक्षय सुनील मांढरे (वय 26, रा.चिमणपुरा पेठ), ऋषभ जाधव, योगेश देवकर व इतर अनोळखी तिघे यांच्या विरुध्द पोलीस तानाजी भोंडवे यांनी तक्रार दिली आहे. गुरुवारी सांयकाळी सव्वा सहा वाजता एकमेकांना मारहाण करत होते. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेवून चौकशी केली असता जुन्या वादातून मारहाण झाल्याचे समोर आले. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
स्थानिक बातम्या
पत्रकारांना दलाल म्हणणाऱ्या मुजोर वाहतूक निरीक्षक शाहरुख खानचे निलंबन
- Sat 6th Apr 2024 12:15 pm
सातारा तालुक्यात चोरीच्या दुचाकींचा पर्दाफाश; 4 वाहने जप्त : सातारा तालुका पोलिसांची कारवाई
- Sat 6th Apr 2024 12:15 pm
मसूर पूर्व भागातील शेतकरी संतप्त; पाण्यासाठी शीत युद्ध सुरू
- Sat 6th Apr 2024 12:15 pm
सत्यजित केसरी पर्व ४ थे’ ला बैलगाडा शौकीनांचा प्रचंड प्रतिसाद
- Sat 6th Apr 2024 12:15 pm
वडगाव निं. अल्पवयीन मुलीच्या गर्भपात प्रकरणातील डॉ. योगेश नरुटे अखेर पोलिसांच्या ताब्यात
- Sat 6th Apr 2024 12:15 pm
पोलीस अधीक्षक निखिल पिंगळेंनी पदभार स्वीकारताच अवैध धंद्यांवर छापे ; १२ जणांवर गुन्हे
- Sat 6th Apr 2024 12:15 pm
संबंधित बातम्या
-
फलटण ग्रामीण पोलिसांनी चार पिस्टल बहाद्दर केले जेरबंद.
- Sat 6th Apr 2024 12:15 pm
-
सातारा तालुक्यात चोरीच्या दुचाकींचा पर्दाफाश; 4 वाहने जप्त : सातारा तालुका पोलिसांची कारवाई
- Sat 6th Apr 2024 12:15 pm
-
शिवीगाळ व धमकी प्रकरणातील फरार आरोपी असीम आतारच्या मुसक्या फलटण पोलिसांनी आवळल्या
- Sat 6th Apr 2024 12:15 pm
-
वडगाव निं. अल्पवयीन मुलीच्या गर्भपात प्रकरणातील डॉ. योगेश नरुटे अखेर पोलिसांच्या ताब्यात
- Sat 6th Apr 2024 12:15 pm
-
वाठार (निंबाळकर) येथील रवींद्र खोपडे यांचा खाजगी सावकारांच्या त्रासाने संसार उध्वस्त.
- Sat 6th Apr 2024 12:15 pm











