नरबळी प्रकरण; भाेंदूबाबांच्या टाेळीस चाप लावा : अंनिसची मागणी...!!

सातारा : सातारा जिल्ह्यातील ढेबेवाडी विभागातील करपेवाडी (ता. पाटण) येथील भाग्यश्री माने या महाविद्यालयीन विद्यार्थीनीचा संशयास्पद मृत्यू हा नरबळी असल्याचे पोलीस तपासात पुढे आले आहे. या पार्श्वभूमीवर सातारा पोलीस दलाने चिकाटीने या प्रकरणाचा तपास लावला. पाेलिसांचे अभिनंदन करत जादूटोणा विरोधी कायद्याची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी व्हावी म्हणून पोलीस मुख्यालयात जिल्हा नोडल अधिकारी नेमावा अशी मागणी महाराष्ट्र अंनिस मार्फत राज्य कार्यकरी समिती सदस्य डॉ हमीद दाभोलकर आणि प्रशांत पोतदार यांनी केली. करपेवाडी प्रकरणातील संशयित हे म्हैसाळ प्रकरणातील मांत्रिकांच्या संपर्कात असल्याच्यामधून या तपासात पुन्हा गती आली. सातारा, सांगली, सोलापूर या भागात गुप्तधनशोध आणि पैशाचा पाऊस पडण्याचे आमिष अशा गोष्टींच्या माधमातून लोकांना फसवणाऱ्या भोंदूबुवांच्या टोळ्या कार्यरत असल्याचे स्पष्ट होत आहे. अंधश्रद्धा निर्मुलन समितीकडे अशा अनेक तक्रारी येत असून संघटीतपणे काम करणाऱ्या ह्या भोंदू बाबाबुवांच्या मुसक्या पोलीस दलाने जशा बकासुर टोळीवर कार्यवाही केली त्याच प्रमाणे आवळाव्या अशी मागणी समितीने केली आहे. जादूटोणा विरोधी कायद्या अंतर्गत असलेली दक्षता अधिकारी हि तरतूद प्रभावी पद्धतीने कार्यान्वित करण्याची गरज ह्या निमित्ताने अधोरेखित होत आहे . कायद्यामधील या तरतुदी नुसार प्रत्येक पोलीस ठाण्यात सिनियर पोलीस अधिकारी हे दक्षता अधिकारी म्हणून कार्यरत असतात. या पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या बाबाबुवांच्या ठिकाणी जावून चौकशी करणे आणि गरज पडल्यास साहित्य जप्त करण्याचे देखील त्यांना अधिकार आहेत. या सारख्या प्रकरणा विषयी विषयी जागरूक नागरिकांनी वेळीच तक्रार केली आणि दक्षता अधिका-यांनी त्यांची दाखल घेतली असती तर अशा घटना टाळता येवू शकतात सांगलीत पैशाचा पाऊस पडण्याच्या आमिषाने फसवणूक केल्याची देखील एक घटना नुकतीच पुढे आली आहे. याा सगळ्या घटना लक्षात घेता सातारा जिल्ह्यातील दक्षता अधिकाऱ्यांची प्रशिक्षण कार्यशाळा हि तातडीने आयोजित करून ती यंत्रणा कार्यान्वित करण्याची मागणी देखील या वेळी त्यांनी केली.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला