सातवीतील मुलगी चार महिन्यांची गरोदर; नववीतील मुलावर गुन्हा दाखल

इंस्टाग्रामवरील मैत्री मुलीला पडली महागात

सातारा : सातारा जिल्ह्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. धक्कादायक म्हणजे इयत्ता सातवीत शिकत असलेली मुलगी चार महिन्यांची गरोदर असल्याने खळबळ माजली आहे.
 मुलीची मासिक पाळी अनियमित येत असल्याने तिला तपासणीसाठी रुग्णालयात नेले असता तिची सोनोग्राफी करण्यात आली त्यानंतर हा धक्कादायक प्रकार समोर आला. दरम्यान या मुलीवर नववीत शिकत असलेल्या एका मुलाने सप्टेंबर महिन्यात मुलीला गोड बोलून तिच्याच घरात तिच्यावर बलात्कार केला होता. हा प्रकार पीडित मुलीने कोणालाही सांगितला नव्हता.
  त्यानंतर मुलीच्या आईने मुलीला विश्वासात घेत विचारपूस केली असता तिने घडलेला सर्व प्रकार सांगितला. यानंतर पिडित मुलीच्या आईने पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली आहे.
याबाबत शाहुपुरी पोलीस ठाण्यात शाळकरी मुलावर पोक्सो कायद्या अंतर्गत, तसेच कलम 376 अंतर्गत आरोपी मुलावर गुन्हा दाखल केला असून, त्याला रिमांड होम मध्ये दाखल केले आहे. तर पीडित मुलीला जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी ठेवण्यात आले आहे. या दोघांची ओळख इन्स्टाग्रामवरून झाली होती.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला