रहिमतपूर बोरगाव मोहितेवाडी रस्त्याचे काम रखडले

 रहिमतपूर :  रहिमतपूर  शहराला जोडणाऱ्या प्रमुख रस्त्यांचे रुंदीकरण व डांबरीकरणाचे काम मोठ्या प्रमाणात सुरू आहे .यातूनच रहिमतपूर  बोरगाव किरोली मोहितेवाडी या रस्त्याचे काम गेल्या दोन वर्षापासून सुरू आहे . रहिमतपूर ते बोरगाव या रस्त्यावर रहिमतपूर नजीक रस्त्यावर खडी अंथरून कॉन्ट्रॅक्टर गायब झाल्यामुळे वाहनचालकांमधून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे .
      याबाबत मिळालेली माहिती अशी की या रस्त्याचे भूमिपूजन 3 जानेवारी 2022 रोजी करण्यात आले होते यासाठी उपमुख्यमंत्री अजित दादा पवार ,माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर , खासदार श्रीनिवास पाटील व तत्कालीन पालकमंत्री आमदार बाळासाहेब पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आले होते .हे काम कराड येथील एका कॉन्ट्रॅक्टरने घेतलेले असून गेल्या दोन वर्षापासून या रस्त्याचे काम सुरूच आहे . सध्या रहिमतपूर ते बोरगाव फाट्यावर संबंधित ठेकेदाराने रस्त्यावरच खडी अंतरली आहे . गेल्या एक महिन्यापासून  काम जैसे ते ठेऊन ठेकेदार गायब आहेत .
सध्या या रस्त्यावरून ऊस वाहतूक करणारे ट्रॅक्टर ,एसटी व खाजगी वाहन दुचाकी यांची मोठी वर्दळ असते .परंतु रस्त्यावर अंथरलेली खडी संपूर्ण रस्त्यावर पसरली आहे.रस्त्याच्या एका बाजूला मातीने खड्डे मुजवलेले आहेत यामुळे एखादे वाहन गेले कि मोठ्या प्रमाणात धुरळा उडत आहे .यामुळे दुचाकी सारखे छोटे वाहन खडीवरून घसरून अपघात होत आहेत .
 तसेच या रस्त्याचे सुरू असलेले काम निकृष्ट पद्धतीचे असल्याचा आरोप  या परिसरातील राहणारी नागरिक व्यक्त करीत आहेत .रस्त्यावर खडी टाकली आहे परंतु त्या खडीच्या खाली डांबरच टाकले नाही .यामुळे संपूर्ण खडी रस्त्यावर पसरलेली आहे . संबंधित ठेकेदाराने तातडीने रस्ता पूर्ण करून द्यावा अशी मागणी वाहनचालक करीत आहेत .

बांधकाम विभागाचे पुर्ण दुर्लक्ष
अर्थसंकल्पात या रस्त्याला सुमारे १२५० - ०० लक्ष एवढी मोठी रक्कम मंजूर  केली आहे . त्यामुळे या रस्त्याचे काम चांगल्या दर्जाचे होण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी लक्ष ठेवणे आवश्यक आहे .परंतु काम सुरू असताना सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी फिरकत नाहीत . रस्ता पुर्ण झाल्यानंतर निकृष्ठ पद्धतीच्या रस्त्यावर परत खड्डे भरायचे काम बांधकाम विभाग करणार का? असा प्रश्न नागरिक उपस्थित करीत आहेत .

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त