श्रीक्षेत्र मोर्वे येथे गुरु पोर्णिमा उत्साहात साजरी

खंडाळा : आषाढ महिन्यात सर्वत्र गुरुपोर्णिमा साजरी केली जात असून सातारा जिल्हातील श्रीक्षेत्र मोर्वे ता. खंडाळा येथील दत्त मंदिरात गुरू पोर्णिमा भाविकांच्या उत्साहात साजरी करण्यात आली. श्री क्षेत्र मोर्वे हि दत्त चिले महाराजांनी आपल्या भटकंतीमध्ये वास्तव्य केलेली भूमि आहे. ह्या मोर्वे गावचा लौकिक हा महाराष्ट्रात पसरला असून श्री चिलेमहाराज हे मूळचे जेऊर पैजारवाडी ता. पन्हाळा जि कोल्हापूर येथील होते. तेथे त्यांची कासवाच्या आकाराची वास्तूशिल्पामध्ये समाधी आहे. मोर्वे येथे भाविक मोठया श्रध्देने व उदात्त भावनेने तर अमावस्या व पोर्णिमेला येत असतात. येथे भव्य असे दत्त मंदिर असून श्री चिले महाराज हे दत्त आवातारामधील प्रमुख अवतार समजले जातात. हे ठिकाण प्रति गाणगापूर म्हणून ओळखले जाते. अशी माहिती ऊँ दत्त चिले उँ ग्रुपचे सदस्य दिलीप फडतरे वडूज यांनी दिली.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त