हॉटेल शिवार गार्डनवर छापा घालुन देशी, विदेशी दारुचा १२,३०० रुपयांच्या मुद्देमाल जप्त उंब्रज पोलीसांची कारवाई

उंब्रज : उंब्रज पोलीस स्टेशनचे प्रभारी सहा. पोलीस निरीक्षक श्री. रविंद्र भोरे यांनी उंब्रज पोलीस स्टेशन हद्दीमध्ये अवैद्य धंद्यावर कारवाई करणे बाबत उंब्रज पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांना सुचना देण्यात आलेल्या होत्या त्याप्रमाणे दिनांक २२/०५/२०२४ रोजी पोलीस उपनिरीक्षक रमेश ठाणेकर, पो. हवा. संजय धुमाळ, पो. कॉ, निलेश पवार, पो. कॉ. सागर साळे हे सरकारी वाहनातुन पेट्रोलींग करीत असताना त्यांना माहिती मिळाली की, इसम नामे अमितकुमार रामचंद्र निकम हा मौजे इंदोली ता. कराड गावचे हद्दीत हॉटेल शिवार गार्डन चोरे रोड येथे आडोशास बेकायदा देशी, विदेशी दारुची चोरटी विक्री करीत आहे. अशी माहिती मिळाल्याने त्यांनी सदर ठिकाणी छापा टाकला असता हॉटेल शिवार गार्डन चे आडोशास इसम नामे अमितकुमार रामचंद्र निकम रा. इंदोली ता. कराड याचे कब्जात बिअर, मॅकडॉल, रॉयल स्टॅग, व्हिस्की, देशी दारु इत्यादी देशी, विदेशी दारुचा एकूण १२,३००/- रुपयेचा मुद्देमाल बेकायदा चोरटी विक्री करीत असताना मिळून आल्याने त्यास ताब्यात घेवून त्यांचे विरुध्द उंब्रज पोलीस स्टेशन मध्ये कायदेशीर कारवाई करणेत आलेली आहे.

सदरची कामगीरी मा. पोलीस अधिक्षक साो, सातारा श्री. समीर शेख साहेब, मा. अप्पर

पोलीस अधिक्षक साो, आचंल दलाल मॅडम, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी साो, श्री. अमोल ठाकुर साहेब यांचे मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस निरीक्षक रविंद्र भोरे, पोलीस उपनिरीक्षक श्री. रमेश ठाणेकर, पो. हवा. संजय धुमाळ, पो. कॉ. निलेश पवार, पो. कॉ. सागर साळे यांनी केली आहे.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त