चौधरवाडी तालुका फलटण येथे ट्रांसफार्मर ची चोरी.

फलटण: फलटण शहर पोलीस स्टेशनच्या वतीने मिळालेल्या माहितीनुसार फलटण शहर पोलीस ठाणे अंतर्गत असणाऱ्या चौधरवाडी तालुका फलटण येथील सागवान डीपी चौधरवाडी येथे इलेक्ट्रिकल ट्रांसफार्मर तोडून कॉपर वायर ची चोरी करण्यात आली आहे तसेच 200 लिटर ऑइल सांडून इलेक्ट्रिकल ट्रांसफार्मर चे नुकसान केले आहे. दिनांक 18 12 2024 रोजी रात्री 01.30 ते सकाळी 09.00 वा. चे दरम्यान कोणीतरी अज्ञात चोरट्याने येथील इलेक्ट्रिकल ट्रान्सफॉर्मर नंबर डीटीसी No.4114211 हा हा तोडून त्याची तोडफोड करून त्यामधील 200 लिटर खाली सांडून त्याचे नुकसान करून ट्रांसफार्मर मधील सुमारे 100 किलो वजनाची 50000/-रुपये किमतीची कॉपर वायर चोरून नेली आहे. 

    मागील दोन वर्षापासून विद्युत कंपनीच्या ट्रांसफार्मर चोरीची घटना फलटण तालुक्यात सातत्याने होत आहे. काही दिवसांपूर्वीच फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनच्या तपास अधिकारी यांनी ट्रांसफार्मर ची चोरी करणारी टोळी जेरबंद केली होती. तरीसुद्धा ट्रांसफार्मरच्या चोरीच्या घटना घडत आहेत. यासाठी मागील आठवड्यात माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि आमदार सचिन पाटील यांनी तहसील ऑफिस येते प्रांत अधिकारी, तहसीलदार ,पोलीस प्रशासन ,यांच्या समवेत शेतकऱ्यांच्या मागणीनुसार बैठक आयोजित केली होती. ट्रांसफार्मर ची चोरी झाल्यानंतर नवीन ट्रान्सफॉर्मर ची उपलब्धता होईपर्यंत संबंधित शेतकऱ्यांना आणि नागरिकांना वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे त्यांच्या दैनंदिन समस्याला तोंड द्यावे लागत आहे यावर प्रशासनाने योग्य ती कारवाई करावी अशी मागणी जनसामान्य जनतेच्या वतीने करण्यात येत आहे


आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त