फलटण येथे विना परवानगी तडीपार बिलाल रफिक कुरेशी यास शहर पोलिस अधिकारी यांनी केली अटक

फलटण : फलटण येथील जिंती नाका येथे दिनांक 17. 12 .2024 .रोजी पहाटे चार वाजता तेज पेट्रोल पंप फलटण येथे तडीपार बिलाल रफिक कुरेशी राहणार कुरेशी नगर मंगळवार पेठ फलटण जिल्हा सातारा हा वरील ठिकाणी पोलिसांना आढळून आला. बिलाल कुरेशि यास .मा. उपविभागीय अधिकारी फलटण यांचे कडील महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 मधील कलम 56 (1) अ. ब. अन्वये संपूर्ण सातारा जिल्हा, तर पुणे जिल्ह्यातील बारामती तालुका व पुरंदर तालुका, सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुका येथून पुढील सहा महिन्यांसाठी तडीपार करण्यात आलेले आहे.

     बिलाल कुरेशी याने कोणाचीही परवानगी न घेता वरील तडीपार आदेशाचा भंग करून तडीपार क्षेत्रामध्ये प्रवेश केला. फलटण शहर पोलीस स्टेशनच्या पोलिसांना तो मिळून आला असता त्यांनी त्या तात्काळ ताब्यात घेतला अधिक तपास फलटण शहर पोलीस ठाणे येथील म. पो. हवा. अश्विनी चव्हाण करत आहेत.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त