अ.ब.ब.... न्यायाधीश : लाच प्रकरणातील मध्यस्थी खासगी इसम मुंबईचा फौजदार...
- Satara News Team
- Sun 15th Dec 2024 09:01 am
- बातमी शेयर करा
सातारा : जामीन मंजूर करून देण्यासाठी पाच लाखांची लाच मिळविण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी जिल्हा व सत्र न्यायाधीश धनंजय निकम यांच्यासह इतर तिघांवर गुन्हा नोंद झाला आहे. त्यामधील खासगी इसम किशोर खरात हे मुंबईत सहायक फाैजदार असल्याचे तपासात समोर आले आहे.
तसेच न्यायाधीश निकम यांच्या घरातही तपासणी करण्यात आली, अशी माहिती पुणे लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्यावतीने देण्यात आली. पुणे येथील एका महिलेच्या वडिलांना सातारा शहर पोलिस ठाण्यातील एका गुन्ह्यात अटक झाली आहे. तसेच त्यांनी सातारा जिल्हा न्यायालयात जामिनीसाठी अर्ज केला होता. हा जामीन अर्ज मंजूर करुन देण्यासाठी पाच लाख रुपयांची मागणी करण्यात आली होती. तसेच ती रक्कम मिळविण्याचा प्रयत्नही झाला.
त्यामुळे याप्रकरणी महिलेच्या तक्रारीवरुन आनंद मोहन खरात (रा. खरातवस्ती, दहिवडी, ता. माण), किशोर संभाजी खरात (रा. वरळी, मुंबई), सातारा जिल्हा न्यायालयातील जिल्हा व सत्र न्यायाधीश क्र. तीन धनंजय लक्ष्मणराव निकम आणि अनोळखी एकजण अशा चाैघांच्याविरोधात गुन्हा नोंद झालेला आहे. तर याप्रकरणी न्यायाधीश निकम यांनी जिल्हा न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी अर्जही केला होता. पण, तो फेटाळला आहे.
स्थानिक बातम्या
नामदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे रविवारी जंगी स्वागत
- Sun 15th Dec 2024 09:01 am
ना.अमित शहा विरुद्ध निंदाजनक ठरावासह मुकधरणे आंदोलन संपन्न
- Sun 15th Dec 2024 09:01 am
सातारा जिल्ह्यात 23 डिसेंबरपासून क्षयरूग्ण शोध मोहिम; सर्वेक्षणासाठी 160 पथके
- Sun 15th Dec 2024 09:01 am
पुसेगाव येथे जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे आयोजन
- Sun 15th Dec 2024 09:01 am
बोरगाव पोलीसानी ट्रॅक्टरची लोखंडी फनपाळी चोरणारा चोरटा 24 तासांचे आत केला जेरबंद
- Sun 15th Dec 2024 09:01 am
लाडकी बहीण योजनेचा सहावा हप्ता जमा होणार..., मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
- Sun 15th Dec 2024 09:01 am
संबंधित बातम्या
-
अवैध शस्त्र बाळगणाऱ्या दोन इसमांना अटक 2 देशी बनावटीची पिस्टल, 2 मॅक्झीन, 2 जिवंत काडतुसे जप्त
- Sun 15th Dec 2024 09:01 am
-
बोरगाव पोलीसानी ट्रॅक्टरची लोखंडी फनपाळी चोरणारा चोरटा 24 तासांचे आत केला जेरबंद
- Sun 15th Dec 2024 09:01 am
-
चौधरवाडी तालुका फलटण येथे ट्रांसफार्मर ची चोरी.
- Sun 15th Dec 2024 09:01 am
-
लहानग्या मुलीला कृष्णा नदीत टाकून मातेचीही आत्महत्या
- Sun 15th Dec 2024 09:01 am
-
फलटण येथे विना परवानगी तडीपार बिलाल रफिक कुरेशी यास शहर पोलिस अधिकारी यांनी केली अटक
- Sun 15th Dec 2024 09:01 am
-
प्रवाशांना लुटणाऱ्या आरोपींना १२ तासाच्या आत सातारा तालुका पोलीसांनी ठोकल्या बेडया
- Sun 15th Dec 2024 09:01 am
-
साताऱ्यातील भोंदू बाबाचा पितळ पडलं उघडं भोंदू बाबा चे कारनामे दहिवडी पोलिसांनी केले उघडणे
- Sun 15th Dec 2024 09:01 am
-
साताऱ्यातील फुलांच्या कास पठारावर रेव्ह पार्टीत धुडगूस; ५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
- Sun 15th Dec 2024 09:01 am