साताऱ्यातील भोंदू बाबाचा पितळ पडलं उघडं भोंदू बाबा चे कारनामे दहिवडी पोलिसांनी केले उघडणे

दहिवडी पोलिसांनी उघडकीस आणला भोंदूबाबाचा प्रॉपर्टी बळकावण्याचा कट

आंधळी :  बनावट कागदपत्रे तयार करून प्रॉपर्टी हडपण्याचा प्रयत्न करणाऱ्या भोंदू बाबाला दहिवडी पोलिसांनी संशयित म्हणून शिदीं बुद्रुक ता. माण येथून काल रात्री ताब्यात घेतली असून त्याची चौकशी केली असता प्रॉपर्टी बळकावण्याच्या उद्देशाने त्यांनी हा कट केला असल्याचे कबूली दिली असून त्याच्यावर दहिवडी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, शिंदी बु! ता. माण जि. सातारा गावातील व्दारकाबाई विष्णु कुचेकर यांचा मुलगा सोमनाथ विष्णु कुचेकर रा. शिंदी बु! ता. माण जि. सातारा हा इयत्ता ८ वी मध्ये १९९७ साली नवमहाराष्ट्र विद्यामंदीर बिदाल येथे शिक्षण घेत असताना कोणास काहीएक न सांगता घरातुन निघुन गेलेला होता. परंतु मुलाच्या प्रेमापोटी आईची माया तीला गप्प बसू देत नव्हती आणि आपला मुलगा कधीतरी येईल या आशेने ती त्याची वाट पाहत होती. साधारणतः गेले नऊ-दहा वर्षा पूर्वी पासुन भोंदु बाबा हा शिंदी बु ! ता. माण जि.सातारा येथे भिक्षा मागण्याकरीता आलेला असताना तो तेथील वयोवृध्द महिला नामे व्दारकाबाई विष्णु कुचेकर यांचे घरी गेला त्याने त्या वृध्द महिलेचे कुटुंबाची व प्रॉपर्टीची माहिती घेतली त्यावेळी व्दारकाबाई विष्णु कुचेकर यांचा मुलगा घरसोडून गेल्याचे व तीचे नावे तीन एकर जमीन असल्याचे त्याला समजल्याने त्याने तोच तिचा मुलगा सोमनाथ विष्णु कुचेकर हा असल्याचे सांगितले आणि वरचेवर तीला भेटु लागला आणि तोच तिचा मुलगा सोमनाथ विष्णु कुचेकर हा असल्याचे सांगायचा. कालांतराने वयोवृध्द महिला व्दारकाबाई विष्णु कचेकर या दिनांक ०९/१२/२०२३ रोजी वृध्दापकाळाने मयत झाल्या त्या मयत झालेल्याला वर्ष पूर्ण झाल्याने त्यांचे नातेवाईकांनी त्यांचे दिनांक २७/११/२०२४ रोजी वर्ष आध्द केले त्यांचे वर्ष श्राद्ध झाल्यानंतर दि. ११/१२/२०२४ रोजी मी सोमनाथ विष्णु कुचेकर आहे असे सांगणारा भादु बाबा याने आईचे वर्षश्राध्द घालनार असल्याचे व्दारकाबाई यांचे नातेवाईकांना समजल्याने त्यांचे नातेवाईक त्या ठिकाणी गेले भोंदु बाबा एकनाथ रघुनाथ शिदें रा.ओझर बुा ता. जामनेर जि.जळगाव याचे बद्दल संशय आल्याने त्यांनी पोलीस स्टेशनला कळविले.

 पोलीसांनी त्याचेकडील तपास कौषल्याचा वापर करुन पोलीसी खाक्या दाखवुन विचारपुस केली असता त्याने त्याचे नाव एकनाथ रघुनाथ शिंदे रा. ओझर बा. ता.जामनेर जि. जळगाव असे असल्याचे सांगुन त्याने व्दारकाबाई विष्णु कुचेकर यांचे नावे असलेली तीन एकर जमीन बळकविण्याचे हेतुने त्यांचा मुलगा सोमनाथ विष्णु कुचेकर याचे नावे असलेली वयाची कागदपत्रे काढून त्यावरुन सोमनाथ विष्णु कुचेकर हा मीच आहे असे भासवून तसे सांगून वावरुन सोमनाथ कुचेकर याचे नाव, पत्ता वापरुन सोमनाथ याचे फोटोचे ठिकाणी त्याचा स्वताचा फोटो वापरुन आधारकार्ड, पॅनकार्ड, स्टेट बँकेचे पासबुक, एटीएम काढले असल्याचे सांगितलेने त्याचे विरुध्द दहिवडी पोलीस स्टेशनला गु.र.नं.५६४/२०२४ बी.एन.एस. ३३६(२), ३३७,३३८,३४०(२), ३१८ (४) अन्वये दाखल करण्यात आलेला असुन सदर व्यक्तीने आनखीकोणा वयोवृध्दाची फसवणुक केली असल्यास त्यांनी आपले नजिकचे पोलीस स्टेशनशी संपर्क करण्या बाबत सहायक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांनी आवाहन केलेले आहे.

 सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक सोो. सातारा, मा. अपर पोलीस अधीक्षक सोो. सातारा मा.उप विभागीय पोलीस अधिकारी सो. दहिवडी यांचे मार्गदर्शनाखाली अक्षय सोनवणे सहायक पोलीस निरीक्षक, पोलीस उप निरीक्षक गुलाब दोलताडे पोलीस हवालदार सचिन वावरे, श्रीनिवास सानप, पोलीस कॉन्स्टेबल निलेश कुदळे, महिंद्र खाडे यांनी केली आहे.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त