लाईट बंद केल्याचा राग मनात धरून वायमनला मारहाण

शाहूपुर येथील व्य़क्तीवर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

सातारा  : शहापूर ता. सातारा गावच्या हद्दीतील मेन डी.पी वायर तुटली. ती दुरूस्त करण्याचे काम वायरमन करत होता. यावेळी विद्युत पुरवठा खंडीत करण्यात आला होता. यांचा राग मनात धरून याच गावातील राज मनोहर देवकर याने वायमनला मारहाण केल्याने त्याच्या विरूद्ध तालुका पोलीस ठाण्यात शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.  
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, शहापूर गावातील मेन डी.पी ची वायर शुक्रवारी तुटली. ती दुरूस्त करण्यासाठी महावितरण चा वायमन सागर कुंडलिक गेला होता. वायर दुरूस्त करताना वीज पुरवठा काही वेळासाठी खंडीत करण्यात आला. यामुळे गावातील सर्वच लाईट बंद झाला. याचा राग मनात धरून याच गावातील राज मनोहर देवकर हा सागरच्या अंगावर धावून गेला. त्यांची कॉलर पकडून छातीत बुक्की मारून, कानाखाली मारली. शिवीगाळ करत सागरला दमदाटीही केली. तुला काय करायचे ते कर म्हणत शासकीय कामात अडथळा आणला. यामुळे राज याच्याविरूद्ध तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक दळवी करत आहेत

आम्हाला जोडण्यासाठी

स्थानिक बातम्या

राजीनाम्याचा लेटर बॉम्ब; साताऱ्यात शिंदे शिवसेनेत खळबळ

राजीनाम्याचा लेटर बॉम्ब; साताऱ्यात शिंदे शिवसेनेत खळबळ

अक्षय तृतीया विशेष : क्रांतिसूर्य महात्मा बसवेश्वर

अक्षय तृतीया विशेष : क्रांतिसूर्य महात्मा बसवेश्वर

फलटण पंचायत समिती सभापती निवडणुकी साठी  निवडणूक निर्णय अधिकारी सौ. प्रियांका आंबेकर( प्रांत ) तथा उपविभागीय अधिकारी फलटण यांचे ऐवजी दुसरा अधिकारी द्या:शिवसेना जिल्हाप्रमुख श्री .चंद्रकांत दादा जाधव.

फलटण पंचायत समिती सभापती निवडणुकी साठी निवडणूक निर्णय अधिकारी सौ. प्रियांका आंबेकर( प्रांत ) तथा उपविभागीय अधिकारी फलटण यांचे ऐवजी दुसरा अधिकारी द्या:शिवसेना जिल्हाप्रमुख श्री .चंद्रकांत दादा जाधव.

पुसेसावळी दुरक्षेत्र परिसरात अवैध धंद्यांचा 'अंधार' आणि उपनिरीक्षकांची 'सुपरसोनिक' नेत्रे?

पुसेसावळी दुरक्षेत्र परिसरात अवैध धंद्यांचा 'अंधार' आणि उपनिरीक्षकांची 'सुपरसोनिक' नेत्रे?

विकासाचा महामेरू सकलजनांसी आधारू.माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर.व आमदार सचिन पाटील यांच्या पाठपुराव्याला यश

विकासाचा महामेरू सकलजनांसी आधारू.माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर.व आमदार सचिन पाटील यांच्या पाठपुराव्याला यश

फलटण शहरातील दैनंदिन पाणीपुरवठ्यासाठी नगराध्यक्ष समशेर सिंह नाईक निंबाळकर ॲक्शन मोडवर

फलटण शहरातील दैनंदिन पाणीपुरवठ्यासाठी नगराध्यक्ष समशेर सिंह नाईक निंबाळकर ॲक्शन मोडवर

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला