सातारा जिल्ह्याच्या विकासासाठी मी कटिबद्ध... नूतन जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी

सातारा  : सातारचे नवीन जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी आज सातारा जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकारांशी संवाद साधला यावेळी त्यांनी पत्रकारांकडून साताऱ्यातील विविध प्रश्न ऐकून घेतले. साताऱ्यातील महत्त्वाच्या प्रश्न पत्रकारांकडून जाणून घेतले आणि या प्रश्नांवर नक्कीच विचार करून योग्य ते निर्णय घेऊन कोणावरही अन्याय होणार नाही अशी भूमिका या पुढील काळात घेण्यात येईल असा विश्वास दिला.
सातारा हा निसर्ग संपन्न जिल्हा आहे एका बाजूला मोठ्या प्रमाणावर पाऊस आहे तर दुसऱ्या बाजूला दुष्काळ आहे अशा भौगोलिक दृष्ट्या विविधतेने संपन्न असलेल्या सातारा जिल्ह्याचा विकास हा येणाऱ्या काळात नक्कीच करण्यात येईल सर्वसमावेशक सर्व लोकांना बरोबर घेऊन सातारा जिल्ह्याच्या विकासासाठी मी कटिबद्ध राहणार आहे असे प्रतिपादन नूतन जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी आपल्या पहिल्या पत्रकार परिषदेत केले.
महाबळेश्वर कास पाचगणी येथील अतिक्रमण बाबत ही त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली . या भागातील सर्व कागदपत्रांची छाननी ही मी स्वतः करणार असून कायद्याच्या आदेशाचा सर्वोच्च सन्मान राखला जाणार असून कायद्याप्रमाणे जी काय आवश्यक कारवाई आहे ती ही केली जाणार आहे. तसेच निसर्गाचा ही समतोल राखण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे कुणाच्याही पोटावर विनाकारण पाय येऊ नये याची खबरदारी ही माझं प्रशासन घेईल अस आवर्जून जिल्हाधिकारी डुडी यांनी पत्रकारांना सांगितले.

तत्कालीन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी महाबळेश्वर पाचगणी बाबत केलेला आराखडा याची अंमलबजावणी ही मी करणार असून मावळते जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी कायद्याप्रमाणे जी पावले उचलली आहेत त्याचा पाठपुरावा करून त्याची अंमलबजावणी करण्याचे संकेत त्यांनी दिले आहेत.एकंदरच नवे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी आज साताऱ्यातील पत्रकारांशी मनमोकळ्या गप्पा केल्या व येणाऱ्या काळात पत्रकारांशी संवाद हा कायम ठेवला जाईल असे आवर्जून सांगितले

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त