युवा नेते तेजस शशिकांत शिंदे यांची राष्ट्रवादी युवकच्या प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती

सातारा : जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे  युवा नेते तेजस शशिकांत शिंदे यांची राष्ट्रवादी युवकच्या प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रवादी युवकच्या जिल्हाध्यक्षपदाचा श्री. शिंदे यांनी मध्यंतरी राजीनामा दिला होता.युवकचे सातारा जिल्हाध्यक्ष व नवी मुंबई प्रभारी असताना त्यांनी राष्ट्रवादी युवकच्या माध्यमातून अनेक आंदोलने, तसेच सामाजिक उपक्रम राबवले होते. आता त्यांच्याकडं युवकच्या प्रदेश उपाध्यक्षपदाची जबाबदारी पक्षानं दिली याबाबतचे नियुक्तिपत्र प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील  यांच्या हस्ते नुकतेच प्रदान करण्यात आले.

.युवकचे सातारा जिल्हाध्यक्ष व नवी मुंबई प्रभारी असताना त्यांनी राष्ट्रवादी युवकच्या माध्यमातून अनेक आंदोलने, तसेच सामाजिक उपक्रम राबवले होते. आता त्यांच्याकडं युवकच्या प्रदेश उपाध्यक्षपदाची जबाबदारी पक्षानं दिली आहे. यापुढील काळात देखील पक्षानं दिलेली जबाबदारी सर्वांना सोबत घेऊन नेटानं पार पाडणार असल्याचं तेजस शिंदे  यांनी म्हटलं आहे.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांचे विचार विरोधी पक्षनेते अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे, आमदार शशिकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली व नेतृत्वाखाली संपूर्ण राज्यात पोचवणार आहे, असे त्यांनी सांगितले. या निवडीबद्दल त्यांचे माजी मंत्री बाळासाहेब पाटील, शशिकांत शिंदे, मकरंद पाटील, युवकचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख आदींसह पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त