शेतकर्‍यांनी निर्यातक्षम हळद उत्पादनाकडे वळावे- श्री प्रशांत शेंडे

वाई : हळद हे वाई तालुक्यातील महत्वाचे नगदी पीक आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी फक्त उत्पादन न घेता निर्यात क्षम पिकाचे उत्पादन कसे घेता येईल याकडे लक्ष द्यावे. तसेच हळद पिकाच्या प्रक्रिया उद्योगाकडे सुद्धा लक्ष द्यावे. त्यासाठी कृषि विभागाच्या योजनामध्ये सहभागी व्हावे असे आवाहन तालुका कृषि अधिकारी श्री प्रशांत शेंडे यांनी केले. महाराष्ट्र शासन कृषि विभाग व वलऍग्रो बायो सायन्स प्रा लि यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कृषि तंत्रज्ञान व्यस्थापन यंत्रणा ( आत्मा)  सातारा अंतर्गत निर्यातक्षम हळद उत्पादन या विषयावरील चर्चासत्रात ते बोलत होते.
    दर्जेदार हळदीला आंतरराष्ट्रीय बाजारात खूप मागणी आहे. त्यादृष्टीने शेतकऱ्यांनी प्रयत्न करावेत  व प्रक्रिया उद्योगासाठी प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग यासारख्या योजनाचा लाभ घ्यावा असे ही आवाहन त्यांनी केले. महा डी बि टी वरील विविध योजनाचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याचे ही आवाहन केले.
   यावेळी नेटाफिम कंपनी चे श्री सतीश राठोड यांनी हळद लागवड तंत्रज्ञान याविषयी मार्गदर्शन केले. वलऍग्रो कंपनी चे श्री नामदेव सोनवलकर यांनी वलऍग्रो कंपनी च्या विविध उत्पादनाविषयी मार्गदर्शन केले व हळद लागवडी विषयी ही मार्गदर्शन केले.
   श्री निखिल मोरे कृषि पर्यवेक्षक यांनी पंजाबराव देशमुख जैविक शेती मिशन या योजनेची माहिती दिली व सर्व शेतकऱ्यांना या योजनेत सहभागी होण्याचे आवाहन केले.श्री तानाजी यमगर कृषि सहाय्यक यांनी खरीप हंगामाच्या अनुषंगाने सोयाबीन बियाणे उगवणक्षमता व सोयाबीन बिजप्रक्रिया याची माहिती दिली.
    कार्यक्रमाला श्री विजय गायकवाड मंडळ कृषि अधिकारी,तालुका तंत्रज्ञान व्यस्थापक श्री प्रदीप देवरे, सहाय्यक तंत्रज्ञान व्यस्थापक श्री योगेश जायकर,वलऍग्रो कंपनी चे श्री मयूर ननावरे, कृषि सहाय्यक श्री भुसारे, सरपंच, उपसरपंच व शेतकरी उपस्थित होते.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त