सदरबझार मध्ये युवकावर कोयता, सत्तूराने वार

सातारा  : दारु पिण्यासाठी पैसे मागून ते दिले नसल्याच्या कारणातून चिडून जावून कोयता व सत्तूराने वार केल्याप्रकरणी तिघांवर सातारा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ही घटना सदरबझार येथे घडली असून तक्रारदार युवक हॉटेल व्यावसायिक आहेत. दरम्यान, सातारा शहरातील कोयता हल्ला थांबता थांबत नसल्याचे पुन्हा समोर आले आहे.
सुरज माने, अल्लाउद्दीन शेख (दोघे रा. लक्ष्मी टेकडी, सदरबझार) व गणेश रजपूत (रा. सदरबझार) या तिघांविरुध्द गणेश सूर्यकांत नवसरे (वय २१, रा. संभाजीनगर, सातारा) यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, ही घटना दि. ४ जुलै रोजी रात्री ८.३० वाजण्याच्या सुमारास सदरबझार येथे घडली आहे. तक्रारदार हे व्यावसायिक आहेत. तक्रारदार त्यांचा मित्र शुभम जाधव याच्यासोबत दुचाकीवरुन जात असताना संशयित तेथे आले. संशयितांनी तक्रारदारासह त्यांच्या मित्राकडे 'दारू पिण्यासाठी पैसे
मागितले.' यावेळी दोघांनी पैसे देण्यास नकार दिल्यानंतर संशयितांनी 'जिवंत सोडणार नाही' असे म्हणत दोघांना धमकी, दमदाटी करत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. यामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. संशयितांनी वादावादी करत सुरज माने याने त्याच्या कंबरेला असलेला कोयता काढला व दहशत माजवली. यामुळे तक्रारदार यांनी तेथून पळून जाण्याचा प्रयत्न करताच संशयिताने धारदार कोयत्याने वार केले. यामध्ये तक्रारदार यांच्या कानामागे व पायावर वार झाल्याने ते जखमी झाले. घटनास्थळी पळापळ सुरू असतानाच अल्लाउद्दीन याने सत्तूर काढून त्यानेही वार केले.
दरम्यान, संशयितांनी लाथा- बुक्क्यांनी मारहाण करुन जखमी केले असल्याचेही तक्रारीत म्हटले आहे. घडलेल्या घटनेनंतर तक्रारदार युवकाने शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पोलिसांनी संशयितांचा शोध घेतल्यानंतर काही जणांची धरपकड केली असून पुढील तपास सुरू आहे.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला