संबंध बिघडल्यावर महिला पुरुषावर बलात्काराचा गुन्हा दाखल करु शकत नाही ..सर्वोच्च न्यायालय
प्रकाश शिंदे - Sat 16th Jul 2022 06:59 am
- बातमी शेयर करा
नवी दिल्ली - सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी एका सुनावणी दरम्यान म्हटलं आहे की, पुरुषासोबत राहणारी महिला संबंध बिघडल्यावर पुरुषावर बलात्काराचा गुन्हा दाखल करु शकत नाही. सर्वोच्च न्यायालयाने यावेळी म्हटलं आहे की, जर एखाद्या महिलेचे कोणत्या पुरुषासोबत संबंध असतील आणि ती स्वत:च्या इच्छेने त्याच्यासोबत राहत असेल, त्यानंतर त्यांचे संबंध बिघडल्यावर महिला बलात्काराचा गुन्हा दाखल करु शकत नाही. हे निरीक्षण नोंदवताना न्यायाधीश हेमंत गुप्ता आणि विक्रम नाथ यांच्या खंडपिठाने आरोपीचा अटकपूर्व जामन मंजूर केला. आरोपीवर बलात्कार, अनैसर्गिक गुन्हे आणि धमकीचा आरोप आहे.
न्यायालयाने म्हटलं आहे की, 'तक्रारदार महिलेचे अपीलकर्ता पुरुषासोबत संबंध होते आणि ते दोघे एकत्र राहत होते. आता त्यांचे संबंध बिघडले आहेत. पण या प्रकरणात भांदवि कलम 376 (2) (एन) अंतर्ग गुन्हा दाखल करता येणार नाही.' राजस्थान उच्च न्यायालयाने भादंवि कलम (CrPC) 438 नुसार अटकपूर्व जामीनासाठी आरोपीचा अर्ज फेटाळल्यानंतर सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती.
सर्वोच्च न्यायालयाकडून राजस्थान हायकोर्टाचा आदेश रद्द
सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणावर सुनावणी देत राजस्थान हायकोर्टाचा आदेश रद्द केला. ज्यामध्ये आरोपीचा जामीन फेटाळण्यात आला होता. खंडपीठाने म्हटलं की, अपीलकर्त्याला सक्षम अधिकार देण्यासाठी जामिनावर सोडण्याचे आदेश दिले आहेत.
राजस्थान हायकोर्टाने काय म्हटलं होतं?
राजस्थान हायकोर्टाने आरोपीला 19 मे रोजीच्या अटकेच्या आदेशावर जामीन देण्यास नकार दिला होता. यावेळी हायकोर्टानं म्हटलं की, याचिकाकर्त्याने तक्रारदार महिलेसोबत लग्न करण्याचा विश्वास देऊन संबंध ठेवले. या संबंधांमुळे एका मुलीचा जन्म झाला. त्यामुळे या प्रकरणाचे गांभीर्य पाहता याचिकाकर्त्याचा जामीन फेटाळण्यात आला.
SupremeCourt
Ministry
स्थानिक बातम्या
मसूर पूर्व भागातील शेतकरी संतप्त; पाण्यासाठी शीत युद्ध सुरू
- Sat 16th Jul 2022 06:59 am
सत्यजित केसरी पर्व ४ थे’ ला बैलगाडा शौकीनांचा प्रचंड प्रतिसाद
- Sat 16th Jul 2022 06:59 am
वडगाव निं. अल्पवयीन मुलीच्या गर्भपात प्रकरणातील डॉ. योगेश नरुटे अखेर पोलिसांच्या ताब्यात
- Sat 16th Jul 2022 06:59 am
पोलीस अधीक्षक निखिल पिंगळेंनी पदभार स्वीकारताच अवैध धंद्यांवर छापे ; १२ जणांवर गुन्हे
- Sat 16th Jul 2022 06:59 am
राजीनाम्याचा लेटर बॉम्ब; साताऱ्यात शिंदे शिवसेनेत खळबळ
- Sat 16th Jul 2022 06:59 am
अक्षय तृतीया विशेष : क्रांतिसूर्य महात्मा बसवेश्वर
- Sat 16th Jul 2022 06:59 am
संबंधित बातम्या
-
शेडगेवाडी पोलीस पाटील यांच्यावर जीवघेणा हल्ला...
- Sat 16th Jul 2022 06:59 am
-
पोलीस अधीक्षक निखिल पिंगळेंनी पदभार स्वीकारताच अवैध धंद्यांवर छापे ; १२ जणांवर गुन्हे
- Sat 16th Jul 2022 06:59 am
-
सुट्टीतही पटपडताळणी, चहा-पाणीची चर्चा; महाबळेश्वर तालुक्यात शिक्षण विभागावर प्रश्नचिन्ह
- Sat 16th Jul 2022 06:59 am
-
खटावच्या विद्यमान तहसिलदारांनी खटावच्या जनतेला दुसऱ्यांदा स्वातंत्र्य मिळवून दिले?
- Sat 16th Jul 2022 06:59 am
-
जिल्हा परिषदेच्या इमारतीत चक्क दुरुस्तीची कामे
- Sat 16th Jul 2022 06:59 am
-
पुसेसावळी येथे लागोपाठ चोऱ्यांचे सत्र सुरूच, पोलिस प्रशासन मात्र हतबल!
- Sat 16th Jul 2022 06:59 am
-
सहा.पो.नि. अक्षय सोनवणे यांचा सराईत गुन्हेगारांना दणका
- Sat 16th Jul 2022 06:59 am
-
पुसेसावळीतील सावकारी च्या 'उदय' मुळे कळंबीतील एक कुटुंब 'अस्त' होण्याच्या मार्गावर...
- Sat 16th Jul 2022 06:59 am












