वेळेवर माहिती न दिल्याने ग्रामसेवीकेला 25 हजार रुपयेचा दंड

पुसेगाव : ग्रामस्थांनी मागितलेली माहिती वेळेत न दिल्याने खातगुण (ता. खटाव) येथील ग्रामपंचायतीच्या ग्रामसेविका सारिका प्रमोद घाडगे यांना राज्य माहिती आयुक्त कार्यालयाच्या पुणे खंडपीठाने २५ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. खातगुण येथील सामाजिक कार्यकर्ते युवराज तुकाराम गायकवाड यांनी २९ ऑगस्ट २०२२ रोजी माहिती अर्जान्वये जुनी ग्रामपंचायत साहित्य लिलाव व वित्त आयोगाकडून प्राप्त निधीची माहिती मागविली होती. याबाबत ग्रामसेवकांनी टाळाटाळ केल्यानंतर, त्यांनी अपील अधिकारी असणाऱ्या पंचायत समितीच्या विस्ताराधिकाऱ्यांकडेही अपील केले होते, तरीही त्यांना माहिती मिळाली नाही. त्यामुळे माहिती अधिनियमातील कलम ७ (१) चा भंग केल्याप्रकरणी गायकवाड यांनी राज्य माहिती आयुक्तांकडे तक्रार केली होती. याची गंभीर दखल घेऊन खंडपीठाचे आयुक्त समीर साहाय्य यांनी घाडगे यांना २५ हजारांचा दंड ठोठावला आहे. संबंधित दंड त्यांच्या मासिक वेतनातून कपात करून शासकीय भरण्यात भरावा, असे आदेश दिले आहेत.

आम्हाला जोडण्यासाठी

स्थानिक बातम्या

जनतेची सेवा नंतर, आधी सदस्यांच्या गाड्यांचा ‘रुबाब’ भारी! सातारा जिल्हा परिषदेत स्टिकर-बॅजची डिजिटल VIPगिरी?

जनतेची सेवा नंतर, आधी सदस्यांच्या गाड्यांचा ‘रुबाब’ भारी! सातारा जिल्हा परिषदेत स्टिकर-बॅजची डिजिटल VIPगिरी?

फलटणच्या आठ बिल्डरांवर बनावट मूल्यांकन दाखल्याप्रकरणी गुन्हा; तिघांना चार दिवसांची पोलीस कोठडी

फलटणच्या आठ बिल्डरांवर बनावट मूल्यांकन दाखल्याप्रकरणी गुन्हा; तिघांना चार दिवसांची पोलीस कोठडी

सातारच्या श्रीमती अरुणा यादव -भुजबळ यांची शिक्षण उपसंचालक पदी पदोन्नती

सातारच्या श्रीमती अरुणा यादव -भुजबळ यांची शिक्षण उपसंचालक पदी पदोन्नती

राज्यात महायुती, स्थानिक पातळीवर ‘तुम्ही तुमचे, आम्ही आमचे’; शशिकांत शिंदेंचा भाजपवर हल्लाबोल

राज्यात महायुती, स्थानिक पातळीवर ‘तुम्ही तुमचे, आम्ही आमचे’; शशिकांत शिंदेंचा भाजपवर हल्लाबोल

वाढे गावातील हॉटेलच्या बनावट ना हरकत दाखला प्रकरणाने खळबळ

वाढे गावातील हॉटेलच्या बनावट ना हरकत दाखला प्रकरणाने खळबळ

दीर्घ व निष्कलंक सेवेची दखल; PSI रऊफ इनामदार यांना केंद्रीय गृह मंत्रालयाचे उत्कृष्ट सेवापदक

दीर्घ व निष्कलंक सेवेची दखल; PSI रऊफ इनामदार यांना केंद्रीय गृह मंत्रालयाचे उत्कृष्ट सेवापदक

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला