ऊसतोड कामगारांना विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी मिळणार ओळखपत्र

 सातारा  : राज्यातील ऊसतोड कामगारांचे व पर्यायाने त्यांच्या कुटूंबाचे राहणीमान उंचावून आयुष्य स्थिर व सुरक्षित करण्यासाठी लोकनेते गोपीनाथ मुंडे उसतोड कामगार महामंडळाची स्थापना करण्यात आलेली असून सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातर्फे ऊसतोडणी  कामगारांना ओळखपत्र देण्याची योजना राबविण्यात येते.

ऊसतोडणी कामगारांना महाराष्ट्र राज्य साखर कारखाना संघाच्या स्तरावरून होणाऱ्या सामंजस्य करारानुसार मजूरी व अन्य लाभ देण्यात येत असले तरीही ऊसतोड कामगारांना भविष्य निर्वाह निधी, कामगार राज्य विमा योजना, उपदान, नुकसान भरपाई, सानुग्रह उपदान इ. सामाजिक सुरक्षितता योजनांचे लाभ मिळत नाहीत. सदर लाभ मिळण्यासाठी ऊस तोडणी कामगारांना ओळखपत्र देण्यात येत आहे.

             सातारा जिल्हयातील ऊसतोड कामगार ज्या ठिकाणी वास्तव्यास असतील व जे सतत मागील 3 वर्षा पासून ऊसतोड कामगार म्हणून काम करत असतील त्यांना साखर कारखान्याचे व्यवस्थापकीय संचालक व गट विकास अधिकारी यांच्या समन्वयाने सर्व्हे करून त्यांना ऊसतोड कामगार असलेचे ओळखपत्र देणेत येत आहे .

           ऊसतोड कामगारांना ओळखपत्र दिल्यानंतर पुढीलप्रमाणे लाभ दिले जातात -ऊसतोड कामगार यांना एक देश एक रेशनकार्ड या योजनेची अंमलबजावणी करणे, ऊसतोड कामगारांकरिता हेल्थ कॅम्प राबविणे, ऊसतोड कामगारांना पाणी पुरवठा / स्वच्छता यांची सोय करणे, ऊसतोड कामगारांच्या मुलांना साखर शाळा सुरू करणे, ऊसतोड कामगारांचे 0 ते 6 वयोगटातील बालकास सकस अहाराची / किंवा अंगणवाडी मध्ये प्रवेश देऊन शैक्षणिक लाभ देणेची अंमलबजावणी करणे, ऊसतोड महिला कामगारांसाठी वास्तव्यास असलेल्या ठिकाणी स्वतंत्र शौचालयाची व्यवस्था करणे, ऊसतोड कामगार यांचे मृत्युनंतर देण्यात येणारे उपदान.

 वरील लाभ मिळण्यासाठी ऊसतोड कामगारांचेकडे ओळखपत्र असणे अपेक्षित आहे. तरी सातारा जिल्हयातील ऊसतोड कामगारांनी सद्या वास्तव्यास असेलेल्या ठिकाणच्या ग्रामसेवकांशी संपर्क करून आपली नाव नोंदणी करावी असे आहवान  सहायक आयुक्त, समाज कल्याण  नितीन उबाळे यांनी केले आहे.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला