खेड परिसरात तब्बल नऊ लाखांची घरफोडी

सातारा : खेड परिसरात अज्ञात चोरट्यांनी तब्बल नऊ लाखांची घरफोडी केल्याची नोंद सातारा शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 13 रोजी सकाळी साडेअकरा ते दुपारी साडेपाच वाजण्याच्या दरम्यान जय मोरया नगर, नक्षत्र बंगलो, खेड, ता. सातारा येथील बापूराव बाबुराव सोनवलकर यांच्या राहत्या बंद घराच्या दरवाज्याची कडी अज्ञात चोरट्यांनी तोडून बेडरूम मधील लाकडी कपाटाच्या ड्रॉवरमध्ये असलेले एकूण 9 लाख 29 हजार पाचशे रुपये किमतीचे व 29 तोळे, सहा ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम घरफोडी चोरी करून नेले आहेत. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक जाधव करीत आहेत.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला