सातारा स्थानिक गून्हे शाखेची धडाकेबाज कामगिरी सुरूच

महाबळेश्वर येथील घरफोडीचा गुन्हा उघड; २ लाख ६६ हजार ५८० रुपयांचा मुद्देमाल व गुन्हयात वापरेलेली पिकअप जप्त

सातारा : महाबळेश्वर येथील काम चालू असले घरातुन अज्ञात चोरटयांनी २,२९,०००/- रुपये किमतीचे पालक यावर कटर मशिन, ड्रील मशीन, अॅल्युमिनीयम व प्लंबोग साहित्य चोरी करून नेलेबाबत महाबळेश्वर पोलीस स्टेशन गुन्हा नोंद करण्यात आलेला होता. या गुन्हयाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक बापू बांगर यांनी सदरचा गुन्हा उघड करणेबाबत स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांना सुचना दिलेल्या होत्या. त्याप्रमाणे पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांनी पोलीस उप-निरीक्षक विश्वास शिंगाडे व पोलीस अंमलदार यांचे पथक तयार करण्यात आलेले होते.
   दिनांक १९/ ०१ / २०२३ रोजी अरुण देवकर, पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा सातारा यांना स्था बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, देगाव फाटा सातारा येथे २ इसम पिकअप जीप मधून चोरीचा माल विक्री करण्यासाठी येणार आहेत. त्यापैकी एकाने काळा पांढरा चौक शर्ट व काळी पेट घातलेली आहे. पिकअप गाडीवर ओम साई ट्रेडर्स असे लिहलेले आहे. त्याप्रमाणे त्यांनी स्थानिक गुन्हे शाखेकडील तपास पथकास नमुद ठिकाणी जाऊन कारवाई करण्याच्या सूचना दिल्या तपास पथकाने देगाव फाटा सातारा येथे जाऊन पिकअप वाहन व स्थातील इसमांना मुद्देमाल पॉलोकंच वायर, कटर मशिन, ड्रील मशीन, अल्युमिनीयम व प्लंबोग साहित्य ताब्यात घेऊन त्यांचेकडे नमुद गुन्हयाचे अनुशंगाने विचारपुस करता त्यांनी सदरचा गुन्हा केला असल्याची कबुली दिली आहे. नमुद आरोपांकडुन गुन्हयात चोरीस मेले माला पैकी १,६६,५८०/- मुद्देमाल गुन्हयात वापरलेली ४,००,०००/- रुपये किंमतीची पिकअप जीप क्रमांक एमएच ११ / टी १५२१ असा एकूण ५,६६,५८०/- जा करणेत आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक संदीप भागवत हे करीत आहेत.
 श्री समीर शेख, पोलीस अधीक्षक सातारा श्री बापू बांगर, अपर पोलीस अधीक्षक सातारा यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक, अरुण देवकर, पो.नि. संदीप भागवत महाबळेश्वर पो.स्टे. स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक संतोष पवार, रविंद्र भोरे, पोलीस उप-निरीक्षक विश्वास शिंगाडे, अमित पाटील पोलीस अंमलदार सफी उत्तम दबडे, तानाजी माने पोहवा अतिश घाडगे, संजय शिके, विजय कांबळे, विश्वनाथ संकपाळ, अजित कर्णे, प्रविण कांबळे, शिवाजी भिसे, स्वप्निल माने, अमोल माने, प्रविण पवार, केतन शिंदे व महाबळेश्वर, पो.स्टे. पो. कॉ. नवनाथ शिंदे यांनी सहभाग घेतला

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला