ध्वनिक्षेपकास मनाई असतानाही मोठ्या आवाजात लावल्याने मंडळातील तीन जणांवर कारवाई

कुडाळ : पोलिस ठाण्याच्या हद्दीत गणेश आगमन सोहळ्यावेळी ध्वनिक्षेपकास मनाई असतानाही कायद्याचे उल्लंघन करून मोठ्या आवाजात ध्वनिक्षेपक लावल्याप्रकरणी कुडाळ (ता. जावळी) पोलिस ठाण्यात तिघांवर कारवाई करण्यात आली.


याप्रकरणी अभिषेक रवींद्र चव्हाण (रा. म्हसवे, ता. जावळी), शुभम शहाजी बाकले (रा. जुळेवाडी, ता. कराड) व कृष्णा पोपट मोरे (रा. गोडोली, ता. जि. सातारा) या ध्वनिक्षेपकांच्या मालकांवर कुडाळ पोलिसांनी कारवाई केली


पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, की सार्वजनिक ठिकाणी मोठ्या आवाजात ध्वनिक्षेपक लावण्यास बंदी आहे, असे असतानाही ए.पी.आऊटलाईन सिस्टीम, पावरप्लस साऊंड सिस्टिम व एस. आर. एस. साऊंड सिस्टिम या ध्वनिक्षेपकाच्या मालकांनी कुडाळ येथील नवज्योत मित्र मंडळ,

संत सावता माळी मंडळ व पिंपळेश्वर मित्र मंडळांच्या ठिकाणी मोठ्या आवाजात ध्वनिक्षेपक लावला होता. मेढा पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक पृथ्वीराज ताटे यांनी ही कारवाई केली.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त