मनोजदादा तुम्ही तर जाईंट किलर
ना. देवेंद्र फडणवीस यांनी मनोजदादा घोरपडे यांचे केले अभिनंदन- Satara News Team
- Tue 26th Nov 2024 02:44 pm
- बातमी शेयर करा
देशमुखनगर : मनोजदादा जिंकलात तुम्ही, अभिनंदन अशा शब्दांत उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांनी कराड उत्तरचे नवनिर्वाचित आमदार मनोजदादा घोरपडे यांचे अभिनंदन करुन सत्कार केला. राज्यात भाजप- महायुतीला जोरदार यश मिळाले आहे. या यशामध्ये ना.देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाला मिळालेली पसंती लक्षणीय आहे. कराड उत्तरच्या वतीने मनोजदादा घोरपडे यांनी फडणवीस यांचे आभार मानले.
यावेळी आमदार मनोजदादा घोरपडे यांच्या सोबत, मा. आमदार शिवेंद्रसिह राजे भोसले,संग्राम घोरपडे, राजू भोसले,कृष्णत शेडगे,उपस्थित होते नुकत्याच पार पडलेल्या महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा निवडणुकीमध्ये ना.देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपा महायुतीला मिळालेल्या ऐतिहासिक विजयाबद्दल आमदार मनोजदादा घोरपडे यांनी ना.फडणवीस यांची सागर बंगला मुंबई येथील निवासस्थानी भेट घेऊन शुभेच्छा दिल्या. कराड उत्तर विधानसभा मतदारसंघात २५ वर्षानंतर परिवर्तन करत आमदार मनोजदादा घोरपडे यांनी ४३६९१ मतांच्या लीडने विजय संपादन केला.
२५ वर्षापासून बाळासाहेब पाटील यांचे नेतृत्व या मतदारसंघात होते. या नेतृत्व बदलाचा चंग मनोजदादा घोरपडे यांनी बांधला होता. त्यासाठी भाजप महायुतीने जोरदार ताकद दिली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाल ता. कराड येथे खंडोबाच्या साक्षीने मनोजदादा घोरपडे यांच्या प्रचाराचा नारळ फोडून मनोजदादा हे कराड उत्तरच्या परिवर्तनाचा जबरदस्त चेहरा असल्याचे सांगितले. हा शब्द शिरोधारी मानत मनोजदादा घोरपडे व कार्यकर्त्यांनी परिवर्तनाची चळवळ उभी केली. या निवडणुकीत मोठे यश मनोजदादा घोरपडे यांनी संपादन केले.
विजयांनंतर आमदार मनोजदादा घोरपडे यांनी सागर बंगाला येथे ना. देवेंद्र फडणवीस यांची भेट घेवून आभार मानले. याप्रसंगी फडणवीस यांनी मनोजदादा घोरपडे यांचे कौतुक करत मनोजदादा जिकंलात तुम्ही अशा शब्दांत अभिनंदन केले.
#karaduttar
स्थानिक बातम्या
सातारा जिल्ह्यातून कोणाला लाल दिव्याची गाडी मिळणार ?
- Tue 26th Nov 2024 02:44 pm
शरदचंद्र पवार इन्स्पायर फेलोशिप विजयकुमार भुजबळ यांची निवड..
- Tue 26th Nov 2024 02:44 pm
मारहाण प्रकारात 20 जणांवर फलटण शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
- Tue 26th Nov 2024 02:44 pm
देशी बनावटीचे 4 पिस्तूल आणि जिवंत काडतुसे विक्री करणाऱ्या एकास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रंगेहात पकडले,
- Tue 26th Nov 2024 02:44 pm
संबंधित बातम्या
-
सातारा जिल्ह्यातून कोणाला लाल दिव्याची गाडी मिळणार ?
- Tue 26th Nov 2024 02:44 pm
-
माळशिरस तालुक्यातील मारकर वाडी येथिल बॅलेट पेपरचीनिवडणूक प्रशासनाने रोखली.
- Tue 26th Nov 2024 02:44 pm
-
कोरेगावातील १८ ईव्हीएम व व्हीव्हीपॅटची तपासणी करता शशिकांत शिंदेंनी भरले 8.5 लाख रुपये
- Tue 26th Nov 2024 02:44 pm
-
विधानसभा निवडणुक प्रक्रियेची चौकशी व्हावी
- Tue 26th Nov 2024 02:44 pm
-
आगामी काळात गोरे बंधू दिसणार विधान भवनात?
- Tue 26th Nov 2024 02:44 pm
-
आठ आमदारांपैकी दोन मंत्रिपद कोणाकोणाच्या गळ्यात पडणार
- Tue 26th Nov 2024 02:44 pm